Air India : पॅरिस-दिल्ली फ्लाईटमध्ये पुन्हा किळसवाणा प्रकार; पुरुषाकडून महिलेच्या ब्लँकेटवर...

एअर इंडियाच्या फ्लाइट 142 मध्ये 6 डिसेंबर रोजी ही घटना घडली.
air india
air indiaSakal

Man Urinating On Co-passenger Blanket : मद्यधूंद यात्रेकरून महिलेच्या अंगावर लघवी करण्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एअर इंडियाच्या प्रवासात किळसवाणा प्रकार समोर आला आहे. याबाबत पीटीआयने ट्वीट केले आहे.

हेही वाचा: ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

पॅरिसहून दिल्लीला येणाऱ्या फ्लाइटमध्ये एका व्यक्तीने महिला प्रवाशाच्या ब्लँकेटवर लघवी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

संबंधित कृत्य करणाऱ्या प्रवाशाने महिलेची लेखी माफी मागितल्याने त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याचे एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या फ्लाइट 142 मध्ये 6 डिसेंबर रोजी ही घटना घडली.

विमानाच्या पायलटने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळावरील एअर ट्रॅफिक कंट्रोलला (ATC) याची माहिती दिली, त्यानंतर किळसवाणं कृत्य करणाऱ्या पुरुष प्रवाशाला पकडण्यात आले.

air india
Delhi News : विमानात महिलेवर लघुशंका करणारा मद्यधुंद दिल्ली भागातच दडून बसला?

६ डिसेंबर रोजी सकाळी ९.४० वाजता विमान दिल्लीत उतरले. यादरम्यान पुरुष प्रवासी दारूच्या नशेत असल्याची माहिती विमानतळ व्यवस्थापनाला मिळाली. तसेच तो केबिन क्रूच्या सूचनांचे पालन करत नव्हता. तसेच त्याने एका महिला प्रवाशाच्या ब्लँकेटवर लघवी केल्याचेही सांगण्यात आले.

विमान लँड होताच या पुरुष प्रवाशाला CISF ने पकडले, परंतु दोन प्रवाशांच्या परस्पर सहमतीने आणि पुरूष प्रवाशाने पीडितेची लेखी मागितली. त्यामुळे त्याच्यावर कोणतीही कारवाई न करता त्याला सोडण्यात आले.

air india
Ayodhya Ram Mandir : राम भक्तांसाठी मोठी बातमी; अमित शाहांकडून उद्घाटन तारखेची घोषणा

26 नोव्हेंबरला न्यूयॉर्क-दिल्ली विमानात एका मद्यधूंद प्रवाशाने महिलेच्या अंगावर लघवी केल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर ही घटना घडली आहे.

पहिल्या प्रकरणात एअर इंडियाच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी संबंधित प्रवाशाविरोधात एफआयआर नोंदवला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com