‘एअर इंडिया वन’ ने घेतली भरारी

नवी दिल्ली - एअर इंडिया वन विमानाची पूजा करताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पत्नी सविता कोविंद.
नवी दिल्ली - एअर इंडिया वन विमानाची पूजा करताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पत्नी सविता कोविंद.

नवी दिल्ली - राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसाठी खरेदी केलेल्या एअर इंडिया वन -बी ७७७ विमानातून राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज चेन्नईत दाखल झाले. नंतर त्यांनी तिरुपती येथे जाऊन भगवान व्यंकटेश्‍वराचे दर्शन घेतले. देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी तयार केलेल्या एअर इंडिया वन-बी ७७७ चा हा उद्‌घाटनपर प्रवास आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिल्लीहून राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद यांच्यासह एअर इंडिया वन चेन्नईत दाखल झाले. तेथे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, मुख्यमंत्री पलानीस्वामी, उपमुख्यमंत्री पनीरसेल्वम यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. दिल्लीहून उड्डाण करण्यापूर्वी या विमानाची पूजा करण्यात आली. राष्ट्रपती कोविंद यांचा पाच तासांचा तिरुपती दौरा असणार असल्याचे राष्ट्रपती भवनाच्या निवेदनात म्हटले आहे. चेन्नईहून ते तिरुपतीला गेले. तिरुपतीत पद्मावती देवीचे दर्शन घेतल्यानंतर दुपारी तिरुमला येथे व्यंकटेश्‍वराचे दर्शन त्यांनी घेतले.  

सध्या कोरोनाचा काळ असल्यामुळे राष्ट्रपतींच्या दौऱ्यात सामील असलेल्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली.

एअर इंडिया वन बोइंगचे वैशिष्ट्ये
एअर इंडिया वन बोइंग ७७७ विमान हे देशातील राष्ट्रपती, उपरराष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या देश-परदेशातील दौऱ्यासाठी तयार करण्यात आले आहे. या श्रेणीतील पहिले विमान एक ऑक्टोबरला दाखल झाले होते. या विमानाची आखणी आणि बांधणीचे काम अमेरिकेत डलास येथे करण्यात आले. या विमानासाठी भारताने २०१८ रोजी बोइंग कंपनीशी करार केला. विशेष म्हणजे हे विमान अमेरिकेहून थेट भारतात विनाथांबा येऊ शकते. देशातील पहिल्या तीन अतिविशिष्ट व्यक्तींना पहिल्या टप्प्यातील विमानसेवेचा वापर करता येणार आहे. एअर इंडिया वन येण्यापूर्वी अतिमहत्त्वांच्या व्यक्तींचा प्रवास एअर इंडियाच्या विमानातून होत असे.

हल्ल्यास प्रत्युत्तर देण्यास सक्षम
एअर इंडिया वन विमान हे कोणत्याही हल्ल्याचा मुकाबला करण्यास सज्ज आहेच त्याचबरोबर प्रत्युत्तर देण्यासही सक्षम आहे. सेल्फ प्रोटेक्शन सूटने सज्ज असल्याने हे विमान शत्रूच्या रडारचे सिग्नल जाम करून क्षेपणास्त्राची दिशा बदलू शकतो. विमानात कॉन्फरन्स रूम, व्हिव्हिआयपी प्रवाशांसाठी एक केबिन, एक मेडिकल सेंटर आणि अन्य मान्यवरांसाठी, कर्मचाऱ्यांसाठी आसनाची सोय आहे. एकदा इंधन भरल्यानंतर हे विमान सलग १७ तास प्रवास करू शकते. सध्या राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान हे एअर इंडियाच्या बी-७४७ मध्ये प्रवास करतात. सध्याचे विमान केवळ दहा तासच सलग प्रवास करू शकते. मात्र दोन्ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले विमान हे हवाई दलाच्या विमानाप्रमाणेच वेगवान आणि अमर्यादित काळापर्यंत उड्डाण करू शकते.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com