एअर इंडियाची विमानसेवा सुरु होणार; 'या' तारखेला पहिलं उड्डाण

Air India to operate special domestic flights to several Indian cities from May 19
Air India to operate special domestic flights to several Indian cities from May 19

नवी दिल्ली : एअर इंडियाची देशांतर्गत विमानसेवा सुरु होणार आहे. लॉकडाउनमुळे देशाच्या वेगवेगळया भागात अडकलेल्या नागरिकांसाठी एअर इंडिया १९ मे ते दोन जून दरम्यान देशांतर्गत विशेष विमाने सोडणार आहे. लॉकडाउनमध्ये अडकलेल्या नागरिकांना आपल्या घरी परतता यावे, यासाठी देशाच्या वेगवेगळया शहरांदरम्यान ही विशेष विमाने उड्डाण करतील.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिल्लीहून १७३, मुंबईहून ४०, हैदराबादहून २५ आणि कोचीहून १२ विमाने उड्डाण करतील. दिल्लीहून जयपूर, बंगळुरु, हैदराबाद, अमृतसर, कोची, अहमदाबाद, विजयवाडा, गया, लखनऊ या शहरांमध्ये विमाने सोडण्यात येतील. मुंबईहून विशाखापट्टणम, कोची, अहमदाबाद, बंगळुरु, हैदराबाद आणि विजयवाडा या शहरांमध्ये विशेष विमाने सोडण्यात येतील.

Coronavirus : दिलासादायक ! ११३ वर्षाच्या आजीबाईंनी कोरोनाला हरवलं

१८ मे पासून लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरु होईल. चौथ्या लॉकडाउनमध्ये नियम पूर्णपणे नवीन असतील असे मोदींनी काल जाहीर केले. या हवाई प्रवासासाठी प्रवाशांना तिकिटाचे पैसे भरावे लागणार असून अजून बुकिंग सुरु झालेली नाही. दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरु या चार प्रमुख महानगरांदरम्यान सर्वाधिक विमाने सोडण्यात येणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com