एअर इंडियाच्या विमानातही घुमणार आता ‘जयहिंद’चा नारा

air-india
air-india

नवी दिल्ली -  एअर इंडिया कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनिच्या विमानातही आता जयहिंदचा नारा घुमणार आहे. तसा आदेश कंपनीने काढला आहे. विमान प्रवासादरम्यान, सर्व कॅबिन क्रू आणि कॉकपिटमधील क्रू मेंबर्सना तशा सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच याची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

याबात अधिक माहिती देताना, एअर इंडियाच्या नव्या नियमावलीनुसार, प्रवासादरम्यान सर्व कर्मचाऱ्यांना विमानातील प्रत्येक जाहीर निवेदनानंतर उत्साहात जयहिंदचा नारा देणे बंधनकारक असल्याचे कंपनिने म्हटले आहे. सरकारी विमान कंपनी असणाऱ्या एअर इंडियामध्ये सध्या 3500 कॅबिन क्रू आणि 1200 कॉकपिट क्रू मेंबर्स आहेत. या सर्वांसाठी याची तत्काळ अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

एअर इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून पहिल्या कार्यकाळात अश्विनी लोहानी यांनी मे 2016 मध्ये वैमानिकांना हा निर्देश जारी केला होता. त्यामुळे या आदेशाची आता पुन्हा एकदा आठवण करुन देण्यात आली आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com