
Air India Plane Crashed: एअर इंडियाचं अहमदाबादहून लंडनला जाणारं AI171 हे विमान टेकऑफनंतर काही वेळातच एका मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर कोसळलं. यावेळी मोठा आवाज झाला आणि सर्वत्र धुराचं साम्राज्य पसरलं होतं. तसंच मोठ्या प्रमाणावर मृतदेहही पडल्याचं एका प्रत्यक्षदर्शी स्थानिक नागरिकानं पीटीआयशी बोलताना सांगितलं.