जेव्हा एअर इडियाच्या विमानाची खिडकी निखळते...

वृत्तसंस्था
रविवार, 22 एप्रिल 2018

एअर इंडियाच्या बोईंग 787 हे विमान अमृतसरहून दिल्लीला येत असताना या विमानात हा अपघात घडला. प्रवासादरम्यान हवेतच एअर इंडियाच्या विमानाची खिडकी निखळल्याने तीन जण जखमी झाले आहेत.

नवी दिल्ली : अत्यंत जलद प्रवास म्हणून विमान सेवेकडे पाहिले जाते. विमानातील व्यवस्था ही इतर प्रवासी सुविधा पुरविणाऱ्यांपेक्षा विशेष अशी मानली जाते. मात्र, आता चक्क एअर इंडियाच्या विमानाची खिडकी निखळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना होता टळली.

एअर इंडियाच्या बोईंग 787 हे विमान अमृतसरहून दिल्लीला येत असताना या विमानात हा अपघात घडला. प्रवासादरम्यान हवेतच एअर इंडियाच्या विमानाची खिडकी निखळल्याने तीन जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे विमानातील प्रवाशांची धांदल उडाली. तसेच या अनपेक्षित अशा प्रकारामुळे सुमारे 15 मिनिटे प्रवासी भयभीत झाले होते. विमानातील प्रवाशांनी सीट बेल्ट न बांधल्याचे सांगितले जात आहे. मात्र, सुदैवाने बाहेरची खिडकी तुटली नाही. यातील विशेष बाब म्हणजे या प्रकारामुळे विमानातील ऑक्सिजन मास्कही बाहेर आलेहोते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर एअर इंडिया प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, चौकशी सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, विमानातील जखमी प्रवाशांना पुढील उपचारांसाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच विमान दुर्घटना चौकशी पथकाला या अपघाताची माहिती देण्यात आली आहे.

Web Title: Air India plane crashes three People injured