एअर इंडियाचे विमान भरकटले

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 मार्च 2017

नवी दिल्ली: लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या एका विमानाचा वाहतूक नियंत्रण कक्षाशी (एटीसी) संपर्क तुटून ते भरकटल्याची घटना घडली. मात्र सुदैवाने लढाऊ विमानांनी त्यास मार्ग दाखविल्याने हे विमान सुखरूप विमानतळावर उतरले.

अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई विमानतळावरून 231 प्रवासी व 18 कर्मचाऱ्यांना घेऊन आज या विमानाने उड्डाण केले होते. हे विमान हंगेरीवरून जात असताना अचानक काही अडचणींमुळे त्याचा एटीसीशी संपर्क तुटला. ही बाब लक्षात येताच त्याच्या मदतीसाठी लढाऊ विमानांना पाठविण्यात आले. नंतर या विमानांनी भरकटलेल्या विमानास मार्ग दाखविल्याने ते लंडन येथील नियोजित विमानतळावर सुखरूप उतरले.

Web Title: Air India plane wandered