Air Pollution Deadlier Than Tobacco
esakal
स्टेट ऑफ ग्लोबल एयर २०२४ ने नुकताच अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार जगात प्रत्येकी आठवा मृत्यू हा वायू प्रदुषणामुळे होत असल्याचं वास्तव पुढे आलं आहे. २०२१ मध्ये तब्बल ८१ लाख लोकांचा मृत्यू केवळ प्रदुषित हवेमुळे झाला आहे. विशेष म्हणजे ही संख्या तंबाखूमुळे होणाऱ्या मृ्त्यूपेक्षाही अधिक आहे. तंबाखूमुळे ७५ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.