

Air Pollution Crisis: Health Insurance Claims Rise 4.3 Times in Three Years; Pune Ranks Second in India
esakal
देशातील वाढत्या वायुप्रदूषणाचा परिणाम आता नागरिकांच्या आरोग्यासोबतच त्यांच्या आर्थिक खर्चावरही होत असल्याचे समोर आले आहे. भारतात प्रदूषणाशी संबंधित आरोग्य विम्याच्या क्लेममध्ये गेल्या तीन वर्षांत तब्बल 4.34 पट वाढ झाली आहे. विमा क्षेत्रातील पॉलिसीबाजार (Policybazaar) या कंपनीने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, या यादीत दिल्ली पहिल्या तर पुणे दुसऱ्या क्रमांकावर आहे.