'ती रात्र वैऱ्याची', 9 मिसाइल होते तयार; घाबरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा मध्यरात्री मोदींना फोन, वाचा इनसाइड स्टोरी

पाकिस्तानी पंतप्रधानांनी मध्यरात्री पंतप्रधान मोदींना फोन केला, पण मोदींनी त्यांच्याशी बोलण्यास नकार कळवला. आज आपण त्या रात्री नेमकं काय घडलं याची इनसाईड स्टोरी जाणून घेणार आहोत.
ajay bisaria book inside story when pm modi did not talk to imran khan  marathi news
ajay bisaria book inside story when pm modi did not talk to imran khan marathi news

14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध आणखी तणावपूर्ण बनले. मात्र भारताने घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर पाकिस्तान आपल्या दहशतवादासंबंधी धोरणाचा पुनर्विचार करावा लागला होता. पाकिस्तानी पंतप्रधानांनी मध्यरात्री पंतप्रधान मोदींना फोन केला, पण मोदींनी त्यांच्याशी बोलण्यास नकार कळवला. आज आपण त्या रात्री नेमकं काय घडलं याची इनसाईड स्टोरी जाणून घेणार आहोत.

या हल्ल्यानंतर भारतीय लष्कर कोणत्याही क्षणी हल्ला करण्यास तयार होते. पाकिस्तानच्या दिशेने 9 भारतीय क्षेपणास्त्र रोखण्यात आली होती. पण पाकिस्तानला हे कळताच संपूर्ण पाकिस्तान सरकार प्रचंड घाबरलं. त्यांनी घाईघाईने मध्यरात्री तत्कालीन भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांचे दार ठोठावले, जेणेकरून चर्चेतून परिस्थिती शांत केली जाऊ शकेल. इतकेच नाही तर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना देखील भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलायचे होते. ज्या रात्री हे सगळं घडलं त्या रात्रीचे वर्णन खुद्द पंतप्रधान मोदींनी 'वैऱ्याची रात्र' असं केलं होतं.

ही 27 फेब्रुवारी 2019 ची रात्र होती. हीच ती रात्र होती ज्यावेळी भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान पाकिस्तानच्या ताब्यात होते. भारत कधीही हवाई हल्ला करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात होती . अजय बिसारिया यांनी त्यांच्या अँगर मॅनेजमेंट या पुस्तकात या घटनेचा उल्लेख केला आहे. भारताच्या मुत्सद्देगिरीचा संदर्भ देत त्यांनी विंग कमांडर अभिनंदनचे प्रकरण आणि भारताच्या मुत्सद्देगिरीमुळे पाकिस्तानने दोन दिवसांत अभिनंदनला कसे सोडले याबद्दल सांगितले.

बिसारिया यांनी सांगितले की, इस्लामाबादमधील भारतातील पाकिस्तानचे तत्कालीन उच्चायुक्त सोहेल महमूद यांचा मध्यरात्री त्यांना फोन आला होता, ज्यांनी सांगितले की इम्रान खान यांना पंतप्रधान मोदींशी बोलायचे आहे. बिसारिया यांनी दिल्लीतील लोकांशी विचारपूस केली आणि महमूदकडे परत आले आणि सांगितलं की यावेली पंतप्रधान मोदी उपलब्ध नाहीत आणि स्वत: उच्चायुक्तांना कोणताही तातडीचा ​​संदेश दिला जाऊ शकतो. त्या रात्री बिसारिया हे महमूद यांच्याशी पुन्हा बोलले नाहीत.

ajay bisaria book inside story when pm modi did not talk to imran khan  marathi news
Mumbai Crime : आठ महिला पोलीस शिपायांवर वरिष्ठांकडून बलात्कार, व्हिडीओही बनवले; घटनेने खळबळ

दुसर्‍याच दिवशी अभिनंदन यांची सुटका झाली

दुसऱ्या दिवश 28 फेब्रुवारी रोजी इम्रान खान यांनी अभिनंदनच्या सुटकेचा पाकिस्तानचा निर्णय जाहीर करताना संसदेत सांगितले की, त्यांनी शांततेसाठी मोदींना फोन करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली नाही.

पाकिस्तानन भारतीय फायटर पायलट अभिनंदन यांच्या सुटकेला शांततेचा संकेत असल्याचे म्हटले, परंतु भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वादात यूएस आणि यूकेच्या राजदूतांसह पाश्चात्य देशांच्या मुत्सद्दींनी फायटर पायलटला इजा झाली असती, तर परिस्थिती किती वाईट झाली असती हे इस्लामाबादला समजावून दिलं. भारताने दिलेला इशारा किती गंभीर आहे याची पाकिस्तानला जाणीव झाली होती. पाकिस्तान खरोखरच घाबरलेला दिसत होता. 26 फेब्रुवारीच्या घटनांनंतर पाकिस्तानने यातील काही राजनैतिक अधिकाऱ्यांना सलग तीन वेळा बोलावण्यात आले होते.

ajay bisaria book inside story when pm modi did not talk to imran khan  marathi news
PM Modi : मालदीवला मोठा झटका! EaseMyTrip ने सस्पेंड केल्या सर्व फ्लाइट्स बुकिंग; PM मोदींवरील टिप्पणी चांगलीच भोवली

यापैकी काही राजदूतांनी रात्रभर भारताच्या परराष्ट्र सचिवांना फोन करून सांगत होते की, पाकिस्तान केवळ अभिनंदनला सोडण्यास तयार नाही, तर भारताच्या पुलवामा डॉसियरवर कारवाई करण्यासही तयार आहे. तसेच दहशतवादाच्या मुद्द्यावर देखील चर्चेला तयार असल्याचे देखील सांगण्यात आले. इम्रान खान दुसऱ्या दिवशी संसदेत या घोषणा करतील, असेही त्यांनी सांगितले.

बिसारिया यांच्या म्हणण्यानुसार, यूएस आणि यूकेच्या राजदूतांनी, डीजी आयएसआय असीम मुनीर (सध्याचे लष्कर प्रमुख) आणि परराष्ट्र सचिव तेहमीना जंजुआ यांच्याशी चर्चा करून, हे फेक ऑपरेशन असल्याचा पाकिस्तानचा दावा नाकारला. त्यांनी केवळ पाकिस्तानी राजनैतिक अधिकाऱ्यांनाच नव्हे तर रावळपिंडीच्या जीएचक्यूलाही भारताचा कडक इशाऱ्याची जाणीव करून दिली.

बिसारिया म्हणतात, भारताची आक्रमक मुत्सद्देगिरी प्रभावी होती, पाकिस्तान आणि जगाकडून भारताच्या अपेक्षा स्पष्ट होत्या. एससीओशिखर परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर बिश्केकमध्ये इम्रान खान आणि नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या भेटीसाठी आणि चर्चेसाठी इम्रान खान यांच्या एका जवळच्या मित्राने बिसारिया यांच्याशी कसा संपर्क साधला होता, हे देखील पुस्तकात स्पष्ट करण्यात आले आहे.

याच्या माध्यमातूनच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान मोदींना सांगितलं की, ते किती प्रामाणिकपणे दहशतवादाचा सामना करण्यासाठी काम करत आहेत. लष्करी कारवाईचा इशारा देताना, 2019 च्या निवडणूक रॅलीत पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, सुदैवाने पाकिस्तानने अभिनंदन यांना सोडले नाहीतर ती रात्र वैऱ्याची होती.

भारताने अधिकृतपणे अभिनंदनच्या सुटकेसाठी पाकिस्तानवर क्षेपणास्त्रे डागण्याबाबत कधीच जाहीरपणे सांगितले नाही, मात्र बिसारिया यांनी स्पष्ट केलं की, या इशाऱ्याने सैन्य आणि इम्रान सरकार अडचणीत आले होते. अभिनंदनला पकडल्यानंतर भारताच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी जंजुआ यांनी 27 फेब्रुवारी रोजी अमेरिका, ब्रिटन आणि फ्रेंच राजदूतांना बोलावले होते. बैठक सुरू असतानाच संध्याकाळी 5.45 च्या सुमारास, जंजुआ यांनी लष्कराकडून आलेला संदेश -भारताने पाकिस्तानच्या दिशेने 9 क्षेपणास्त्रे रोखली असून ती त्या दिवशी कधीही सोडली जाऊ शकतात - वाचण्यासाठी संभाषण थांबवलं .

त्यांनी राजदूतांना ही विश्वसनीय माहिती त्यांच्या राजधानीतीत रिपोर्ट करावी आणि भारतासोबच टेन्शन वाढू न देण्याबाबत दबाव आणण्यास सांगितले. त्यानंतर लगेच भारतीय कार्यवाहक उच्चायुक्तांना देखील बोलवण्यात आले. यानंतर इम्रान खान यांनी मोदींशी बोलण्याचा प्रयत्न केला.

ajay bisaria book inside story when pm modi did not talk to imran khan  marathi news
पुन्हा ठाकरेंना धक्का बसणार? शिवसेना अपात्रता प्रकरणात मोठी अपडेट आली समोर; दोन दिवसात येणार निकाल

एका पाश्चिमात्य राजनैतिक अधिकाऱ्यांने नंतर बिसारिया यांना सांगितले की, भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानने आपल्या दहशतवाद धोरणांवर पुनर्विचार करण्यास सुरुवात केली आहे. लष्करप्रमुख कमर बाजवा यांनीही भारताने तयार केलेल्या पुलवामा डॉसियरवर पाश्चात्य राजनैतिक अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आश्वासन दिले. पाकिस्तानच्या गांभीर्याबद्दलचा सर्वात महत्त्वाचा पुरावा काही महिन्यांनंतर बिसारिया यांना आयएसआयच्या जवळच्या व्यक्तीने रात्री 2 वाजता केलेल्या फोन कॉलच्या रूपात मिळाला. या फोनवरून भारतीय उच्चायुक्तांना एका अनपेक्षित घटनेबद्दल सावध केले होते.

अल कायदाने आपला ऑपरेटिव्ह झाकीर मुसाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हा हल्ला केला होता. मुनीरच्या नेतृत्वाखालील आयएसआय केवळ लष्करी स्तरावरच चर्चा करू इच्छित नव्हती, तर भारत सरकारशी संवाद साधण्यासाठी उच्चायुक्तांकडे ही माहिती दिली जावी अशी त्यांची इच्छा होती. ही एक गुप्त माहिती होती, हे तेव्हा स्पष्ट झाले जेव्हा अंदाजे सांगण्यात आलेली वेळ आणि ठिकाणाच्या आसपास हा हल्ला झाला. बिसारिया यांनी या घटनेतून निष्कर्ष काढला की, ही इनपुट दिली कारण एकतर पाकिस्तानला दुसरा पुलवामा नको होता किंवा बाजवा त्या वर्षी जूनमध्ये होणाऱ्या एससीओ शिखर परिषदेपूर्वी वातावरण सुधारण्यासाठी काम करत होते.

बालाकोट एअर स्ट्राईकवेळी काय झालं?

बालाकोट हवाई हल्ल्यापूर्वी भारत सरकारमध्ये झालेल्या चर्चेचा उल्लेख देखील या पुस्तकात करण्यात आला आहे. बिसारिया यांनी मोदी आणि तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या दोघांनाही सांगितले होते की, पुलवामासारख्या दहशतवादी हल्ल्याचा सामना करण्यासाठी भारताचे राजनैतिक पर्याय मर्यादित आहेत. स्वराज यांनी त्यांना सांगितले की काही कठोर कारवाई केली जाणार आहे, लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी त्यांना सांगितले की भारताचा बदला स्ट्राइक 2016 च्या सर्जिकल स्ट्राइकपेक्षा खूप मोठा असेल. बाजवा यांना भारतासोबत शांततेत रस असल्याचे रावत यांनी मान्य केले होते. मात्र त्यांनी अनेकदा आयएसआय आणि पाकिस्तान कॉर्प्स कमांडर्सना अजेंडा सेट करू देत होते, जे बाजवा यांच्या सिद्धांतावर नाराज होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com