

Ajay Gupta Claims He Is Only a Sleeping Partner of Luthra Brothers
Esakal
गोव्यातील नाइट क्लबमध्ये भीषण आग लागून २५ लोकांचा मृत्यू झाल्यानंतर क्लबचे मालक परदेशात पळून गेले आहेत. मंगळवारी या प्रकरणी दिल्लीतून अजय गुप्ताला अटक करण्यात आली. तो दिल्लीतील लाजपतनगर इथं असलेल्या इन्स्टिट्यूट ऑफ ब्रेन अँड स्पाइनमध्ये दाखल झाल्यानंतर ताब्यात घेण्यात आलं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्ताला च्याचा चालक रुग्णालयात घेऊन गेला होता. नाइट क्लबच्या घटनेबाबत विचारलं असता अजय गुप्ताने मी फक्त स्लीपिंग पार्टनर आहे असं सांगितलं.