
भाजप नेत्याने प्रेयसीसाठी पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना १० ऑगस्ट रोजी राजस्थानच्या अजमेरमध्ये घडली. या प्रकरणी पोलिसांनी आज भाजप नेत्यासह त्याच्या दोन मित्रांना आणि प्रेयसीला अटक केली आहे. पोलिस तपासात त्यांनी गुन्हा कबूल केला आहे. रोहित चैनी असं या भाजप नेत्याचं नाव आहे, तर ऋतू असं त्याच्या प्रेयसीचं नाव आहे.