esakal | लग्नाच्या वाढदिवसाचं मोठं गिफ्ट; आपल्या 'हनी'साठी पठ्ठ्यानं 'मून'वर घेतला प्लॉट!
sakal

बोलून बातमी शोधा

ajmer man moon land

आपल्या लग्नाच्या आठव्या वाढदिवसानिमित्त आपल्या पत्नीसाठी ते काही खास करु इच्छित होते.

लग्नाच्या वाढदिवसाचं मोठं गिफ्ट; आपल्या 'हनी'साठी पठ्ठ्यानं 'मून'वर घेतला प्लॉट!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

अजमेर : अनेक लोक चंद्रावर जमीन असण्याचं स्वप्न पाहतात. 'तुझी काय चंद्रावर जमीन हाय व्हय?' असा उल्लेख आपण सहजच जाता जाता करुनही जातो. आपल्या प्रियकर-प्रियसीला चंद्राची उपमा देण्याची रित तशी जुनीच! मात्र, खरोखरीच बायकोसाठी चक्क चंद्रावरच जमीन घेणारा पठ्ठ्या वास्तवात आहे. आपल्या बायकोला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त थेट चंद्रावरच प्लॉट विकत घेऊन देण्याचा पराक्रम एकाने केला आहे. 

पती धर्मेंद्र अनीजा यांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सपना अनीजा चंद्रावर तीन एकर जमीन गिफ्ट केली आहे. धर्मेंद्र यांनी म्हटलं की त्यांनी आपल्या लग्नाच्या आठव्या वाढदिवसानिमित्त आपल्या पत्नीसाठी काही खास करु इच्छित होते. यासाठी म्हणून त्यांनी चंद्रावर जमीन खरेदी केली आहे. त्यांनी म्हटलंय की, 24 डिसेंबर रोजी आमच्या लग्नाचा वाढदिवस होता. मी माझ्या पत्नीसाठी काही खास करु इच्छित होतो. प्रत्येकजण एखादी कार अथवा दागदागिने गिफ्ट करतात. मात्र, मी काहीतरी वेगळं करु इच्छित होतो. म्हणून, मी तिच्यासाठी चंद्रावर जमीन खरेदी केली आहे. 

धर्मेंद्र यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील एक फर्म लून सोसायटी इंटरनॅशनलच्या माध्यमातून चंद्रावर जमीन खरेदी केली आहे. त्यांनी म्हटलं की, चंद्रावर जमीन खरेदी करण्याच्या प्रक्रियेला पूर्ण होण्यास तब्बल एक वर्ष लागलं. त्यांनी म्हटलं की, मला खूप आनंद होतोय. मला वाटतंय की चंद्रावर जमीन खरेदी करणारा मी राजस्थानचा पहिला व्यक्ती आहे. धर्मेंद्र यांच्या पत्नी सपना यांनी म्हटलंय की, त्यांना त्यांच्या पतीकडून 'जगावेगळं' काहीतरी गिफ्ट मिळेल, अशी अपेक्षा नव्हती. 

हेही वाचा - Mann Ki Baat : संकट घेऊन आलेल्या 2020 ने शिकवली 'आत्मनिर्भरता' : PM मोदी

पुढे त्यांनी म्हटलं की, मी खूप खुश आहे. मला कधीच आशा नव्हती की ते मला असं काहीतरी खास गिफ्ट करतील. काही महिन्यांपूर्वी,  बिहारमधील बोधगयाचे रहिवासी नीरज कुमार यांनीदेखील अभिनेता शाहरुख खान आणि सुशांत सिंह राजपूतपासून प्रेरणा घेऊन आपल्या वाढदिवसानिमित्त चंद्रावर एक एकर जमीन खरेदी केली होती.