आमदाराच्या घरात सापडली एके-47, हँड ग्रेनेड

bihar
bihar

पाटणा : बिहारमध्ये एका अपक्ष आमदाराच्या घरात एके-47 रायफल, दोन हँड ग्रेनेड आणि काडतुसे सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आमदाराला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटणाजवळील बरह पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या लाडमा गावातून अपक्ष आमदार अनंत सिंह यांच्या घरातून हे सर्व जप्त करण्यात आले आहे. पोलिसांकडून अद्याप तपास सुरु आहे. गुन्हेगारी जगतातून राजकारण आलेल्या अनंत सिंह यांची ओळख छोटे सरकार अशी आहे. 

अनंत सिंह यांना यापूर्वीही 25 जून 2015 मध्ये अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्याकडून रायफल, काडतुसे, बुलेट प्रुफ जॅकेट्स सापडली होती. अनंत सिंह हे मोकामा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. या प्रकरणाची चौकशी एनआयएकडे देण्यात येणार आहे. त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे कोठून आली याची चौकशी करण्यात येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com