अकाली दल देणार शेतकऱ्यांना कर्जमाफी

वृत्तसंस्था
बुधवार, 25 जानेवारी 2017

उपमुख्यमंत्री बादल यांच्या हस्ते निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध

लुधियाना- पंजाबमधील सत्तारूढ शिरोमणी अकाली दलाने छोट्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, 20 लाख तरुणांना रोजगार, उद्योगांसाठी मोठ्या इमारती आणि अडचणीच्या वेळी गरिबांना साह्य करण्याची आश्‍वासने देणारा निवडणूक जाहीरनामा आज प्रसिद्ध केला आहे. पंजाबचे उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांच्या हस्ते जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. "जो केहा वो कर विखाया' अशी जाहीरनाम्याची घोषणा आहे.

येत्या चार फेब्रुवारीला पंजाब विधानसभेसाठी मतदान होणार आहे.

बादल म्हणाले, ""या आधी आम्ही जी आश्‍वासने दिली आहेत ती पूर्ण केली आहेत. पंजाबमधील वीजनिर्मितीत वाढ, शगुन आणि आटा-डाळसारखी समाजकल्याण योजना, राज्यातील 165 गावांना शुद्ध पाण्यासाठी जलशुद्धीकरण योजनेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आता अशा योजना राज्यातील सर्व 12 हजार गावांसाठी राबविण्यात येतील. सौर ऊर्जेच्या दिव्यांसह रस्त्यांचे सिमेंटीकरण केले जाईल. नागरिकांना दहा रुपये किलोने साखर, 25 रुपये किलो दराने दोन किलो तूप देण्याचा आमचा मानस आहे.''

"शिरोमणी अकाली दल आणि भाजप युती सरकारकडून छोट्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबरोबरच शंभर क्विंटल खताला शंभर रुपये सूट दिली जाईल. सर्व छोटे शेतकरी शेतीची बियाणे खरेदीसाठी दोन लाख रुपयांच्या व्याजमुक्त कर्जाला पात्र असतील. तसेच शेतीकामासाठी रोज दहा तास मोफत वीजपुरवठा केला जाईल. शेतीचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतमजुरांनाही त्याची भरपाई मिळेल. राज्यातील दहा लाख तरुणांना 25 हजार कौशल्य केंद्रात रोजगार उपलब्ध करून दिला जाईल. पाच गावांत मिळून एक कौशल्य केंद्र असेल. त्याचबरोबर 50 हजार तरुणांना टॅक्‍सी खरेदीसाठी कोणतेही आगाऊ शुल्क न घेता सुलभ कर्ज दिले जाईल. औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्रातही रोजगार उपलब्ध करून दिला जाईल,'' असे त्यांनी सांगितले.

Web Title: Akali Dal manifesto released