इतना मारूंगा कि खून निकलने लगेगा: ओवेसी

वृत्तसंस्था
सोमवार, 3 डिसेंबर 2018

हैदराबादः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रत्येक गोष्टीत चहा आणतात. आता पंतप्रधान आहात पंतप्रधानांसारखे वागा चहावाल्यासारखे वागू नका. चाय वाले, हमें मत छेड़, चाय-चाय चिल्लाते हो, याद रखो इतना बोलूंगा-इतना मारूंगा कि कान में से पीप निकलने लगेगा, खून निकलने लगेगा', असे एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे.

एका रॅलीदरम्यान बोलताना ओवेसी म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रत्येक गोष्टीत चहा आणतात. कडक चहा, नरम चहा, चहापत्ती, निर्णय घेतला की चहाचा विषय. चर्चा करायची असेल तर चहाचा विषय अरे तुम्ही चहावाले होतात. आता पंतप्रधान आहात पंतप्रधानांसारखे वागा चहावाल्यासारखे वागू नका. चहावाले आम्हाला त्रास देऊ नका. चहा-चहा म्हणून ओरडता, याद रखो इतना बोलूंगा-इतना मारूंगा कि कान में से पीप निकलने लगेगा, खून निकलने लगेगा. पंतप्रधान नरेंद्र मोदी कायम त्यांच्या भाषणामध्ये मी चहावाला होतो. एक चहावाला देशाचा पंतप्रधान झाला याचा विरोधकांना त्रास होतो. ‘चायपे चर्चा’चे उदाहरणही ते देतात.'

तेलंगणामधील 5 डिसेंबर रोजी प्रचार संपत आहे. मात्र, प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. ओवेसी यांनीही पंतप्रधानांवर यापूर्वीही अनेकदा टीका केली असून, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही टीका केली.

Web Title: akbaruddin owaisi has given a controversial statement about pm modi