आखाडा परिषदेकडून 'फेक' बाबांची दुसरी यादी जाहीर

sadhu
sadhu

लखनौ - अखिल भारतीय आखाडा परिषदेने बनावट (फेक) बाबांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत वीरेंद्र दीक्षित कलनेमी (दिल्ली), सच्चिदानंद सरस्वती (बस्ती) आणि त्रिकाल भवंत (अलाहाबाद) या प्रमुख बाबांचा समावेश आहे.

आखाडा परिषदेने यापूर्वीही बनावट बाबांची यादी जाहीर केली होती. त्यावरून खूप वाद निर्माण झाला होता. हिंदू साधू व सेवकांची अखिल भारतीय आखाडा परिषद ही प्रमुख संस्था आहे. स्वामी नरेंद्र गिरी महाराजांनी ही बनावट बाबांची दुसरी यादी जाहीर केली आहे. अशा साधू, संतांपासून सामान्य नागरिकांनी दूर रहावे. यांच्या वागण्यातून कोणतीही संस्कृती दिसत नसल्याचे, नरेंद्र गिरी यांनी म्हटले आहे.

यावर्षाच्या सुरवातीला आखाडा परिषदेने बनावट बाबांची यादी जाहीर केली होती. डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम सिंह याला 20 वर्षांची शिक्षा झाल्यानंतर आखाडा परिषदेकडून यादी जाहीर करण्यात आली होती. या यादीत आसाराम बापू, राधे माँ, स्वामी असिमानंद, निर्मल बाबा, गुरमीत राम रहिम आणि ओम बाबा यांचा समावेश होता. आता दुसऱ्या यादीत 17 जणांचा समावेश आहे.

बनावट बाबांची यादी -
वीरेंद्र दीक्षित कलनेमी, सच्चिदानंद सरस्वती, त्रिकाल भवंत, आसाराम बापू, राधे माँ, सच्चिदानंद गिरी, गुरमीत राम रहिम सिंह, ओम बाबा, निर्मल बाबा, इच्छाधारी भिमानंद, स्वामी असिमानंद, ओम नम: शिवाय बाबा, नारायण साई, रामपाल, आचार्य कुशमुनी, ब्रहस्पती गिरी, मल्खान सिंग.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com