सत्तेचा मुलायम फॉर्म्युला अखिलेश यांना नामंजूर

वृत्तसंस्था
बुधवार, 11 जानेवारी 2017

लखनौ : नेताजी मुलायमसिंह यादव यांनी अखिलेश हेच आमचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील, असे मान्य केल्यानंतरही समाजवादी पक्षातील अंतर्गत कुरघोड्या अद्याप सुरूच आहेत. आज अखिलेश यांनी मुलायम यांची भेट घेऊन तब्बल दोन तास बंद दाराआड त्यांच्याशी चर्चा केली.

या वेळी मुलायम यांनी पक्ष विजयी झाल्यास तूच मुख्यमंत्री होशील, पक्षाचे सगळे अधिकार तुझ्याकडेच राहू दे; पण अध्यक्षपद मला दे, असा प्रस्ताव अखिलेश यांच्यासमोर ठेवला होता, पण त्यांनी तोही धुडकावून लावला. मी अध्यक्षपद सोडले, तर अमरसिंह काहीही निर्णय घेऊ शकतात, अशी भीती अखिलेश यांनी बोलून दाखविली. दरम्यान, मुलायम आणि अखिलेश गटामध्ये "सायकल' या पक्ष चिन्हावरून सुरू असलेल्या संघर्षाबाबत निवडणूक आयोग 13 जानेवारी रोजी दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेईल आणि त्यानंतर आपला निर्णय देईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सोमवारी समाजवादी पक्षातील संघर्षाला अचानक यूटर्न मिळाला होता, मुलायमसिंह यांनी अखिलेशच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील, असे जाहीर केल्यानंतर पक्षांतर्गत लाथाळ्या संपतील अशी शक्‍यता वर्तविली जात होती; पण आज झालेल्या चर्चेत अखिलेश यांनी माघार घेण्यास नकार दिला. तत्पूर्वी मुलायम यांनी पक्षातील यादवीचे खापर रामगोपाल यादव यांच्या डोक्‍यावर फोडले होते. रामगोपाल हे अखिलेशची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

Web Title: akhilesh disapproves mulayam formula