'सायकल'वर अखिलेश स्वार; मुलायमसिंह पेचात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

नवी दिल्ली/लखनौ- सायकल या निवडणूक चिन्हावरील अखिलेश यादव यांचा दावा निवडणूक आयोगाने मान्य केला असून, त्यांना हे चिन्ह देण्यात आले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये सायकल या पक्षाच्या अधिकृत चिन्हाचा फायदा अखिलेश यांच्या नेतृत्वाखालील गटाला होणार आहे. दरम्यान, मुलायमसिंह कोणत्या चिन्हावर निवडणूक लढविणार याबाबत उत्सुकता आहे.

समाजवादी पक्षात उभी पडल्यानंतर मुलायमसिंह आणि शिवपाल यांचा एक गट, तर मुख्यमंत्री अखिलेश आणि रामगोपाल यादव यांचा दुसरा असे गट निर्माण झाले. या दोन्ही यादव गटांनी विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पक्षातील दोन्ही गटांनी 'सायकल' या पक्षाच्या अधिकृत चिन्हावर दावा केला होता. 

याबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाने राखून ठेवला होता. या वादामुळे जर निवडणूक आयोगाने सपाचे चिन्ह गोठविण्याचा निर्णय घेतला, तर सपाने आपल्या चिन्हावर निवडणूक लढवावी, असा पर्याय लोकदालाचे नेते सुनील सिंग यांनी मुलायमसिंह यादव यांच्यापुढे ठेवला आहे. 
'बियाणे लावताना शेतकरी' हे लोकदलाचे निवडणूक चिन्ह आहे. या चिन्हावर मुलायमसिंह आता निवडणूक लढविणार का याबाबत उत्सुकता आहे.
 
Web Title: akhilesh gets cycle symbol; speculations about mulayam