अखिलेश राष्ट्रीय अध्यक्ष; अमरसिंहांची हकालपट्टी

वृत्तसंस्था
रविवार, 1 जानेवारी 2017

नेताजींबद्दल मला किती आदर आहे, हे पूर्ण देशाला माहिती आहे. त्यांच्याबद्दल मला पूर्वीही आदर होता आणि आताही आहे. नेताजींविरोधात कोणी बोलत असेल तर, त्याला विरोध करण्याचे माझे काम आहे.

लखनौ - समाजवादी पक्षातील अंतर्गत दंगलीत मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी बाजी मारल्यानंतर आता अखिलेश यादव यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच अमरसिंह यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

समाजवादी पक्षाच्या आज (रविवार) झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. अखिलेश यांचे निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाल्यानंतर आज झालेल्या बैठकीत अखिलेश यांची बिनविरोध राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव यांना पदावरून हटविण्यात आले आहे. तर, समाजवादी पक्षातील कलहाला जबाबदार धरण्यात येणाऱ्या अमरसिंह यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. मुलायमसिंह यांना पक्षाचे मार्गदर्शक बनविण्यात आले आहे.

अखिलेश यादव म्हणाले, की नेताजींबद्दल मला किती आदर आहे, हे पूर्ण देशाला माहिती आहे. त्यांच्याबद्दल मला पूर्वीही आदर होता आणि आताही आहे. नेताजींविरोधात कोणी बोलत असेल तर, त्याला विरोध करण्याचे माझे काम आहे. माझ्या आयुष्यात नेताजींचे मोठे स्थान असून, त्यांच्यासाठी मी काहीही त्याग करण्यास तयार आहे. 

Web Title: Akhilesh Unanimously Elected as National President of Party: Ram Gopal Yadav