राफेल खरेदी व्यवहाराची संसदीय समितीमार्फत चौकशी करा- अखिलेश

वृत्तसंस्था
रविवार, 23 सप्टेंबर 2018

राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणावरुन देशातील राजकीय वातवरण तापले आहे. फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्स्वा ओलाँद यांच्या राफेल व्यवहारासंदर्भातील विधानामुळे फ्रान्ससह भारतातही खळबळ उडाली आहे. यावरुन विरोधकांनी सत्ताधारी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. यामध्ये समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनीसुद्धा मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी याप्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी व्हायला हवी, अशी मागणी अखिलेश यांनी केली आहे. 

नवी दिल्ली: राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणावरुन देशातील राजकीय वातवरण तापले आहे. फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्स्वा ओलाँद यांच्या राफेल व्यवहारासंदर्भातील विधानामुळे फ्रान्ससह भारतातही खळबळ उडाली आहे. यावरुन विरोधकांनी सत्ताधारी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. यामध्ये समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनीसुद्धा मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी याप्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी व्हायला हवी, अशी मागणी अखिलेश यांनी केली आहे. 

राफेल डील प्रकरणाचा मुद्दा आता जागतिक स्तरावर पोहोचला आहे. याप्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी व्हावयला हवी. सत्य काय आहे, ते संसदीय समितीमार्फत चौकशी केल्याशिवाय बाहेर येणार नाही, लोकांना सत्य काय आहे ते कळायला हवे. राफेल व्यवहाराचे सत्य संसदीय समितीमार्फत चौकशी झाल्यावर बाहेर येईल, असेही अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.

दरम्यान, फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्स्वा ओलाँद यांनीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चोर म्हणले आहे. मोदींनी स्पष्टीकरण द्यावे आणि सांगावे ओलाँद खोटे बोलत आहेत, अशी खरमरीत टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल (ता.22) घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली होती. भारत सरकारने रिलायन्स कंपनीचे नाव सुचवले होते यावरून त्यांनी सरकारला लक्ष्य केले आहे. राफेल करारावर मोदी अजूनही गप्प आहेत हे थक्क करणारे आहे. भारताच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच कोणीतरी परदेशी अध्यक्षांनी भारतीय पंतप्रधानांना चोर म्हटले आहे, हे खूपच निंदनीय असल्याचा उल्लेखही राहुल गांधी यांनी यावेळी केला होता.

Web Title: Akhilesh Yadav Demands JPC Probe Into Rafale Deal Says Issue Has Now Become Global