अखिलेश यादव यांची समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी फेरनिवड 

पीटीआय
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

पक्षाचे ज्येष्ठ नेते राम गोपाल यादव यांनी पक्षाच्या आग्रा येथील राष्ट्रीय अधिवेशनात फेरनिवडीसाठी निवडणुका घेण्याचे जाहीर केले होते. परंतु, पक्षाच्या नियमावलीत सुधारणा करुन सध्या असलेले पक्षाचे अध्यक्ष यांनाच पुढे पाच वर्षासाठी बढती देण्याचा निर्णय एकमताने मंजूर करण्यात आला

लखनऊ - अखिलेश यादव यांची (गुरुवारी) एकमताने पुढील पाच वर्षांसाठी समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 

पक्षाचे ज्येष्ठ नेते राम गोपाल यादव यांनी पक्षाच्या आग्रा येथील राष्ट्रीय अधिवेशनात फेरनिवडीसाठी निवडणुका घेण्याचे जाहीर केले होते. परंतु, पक्षाच्या नियमावलीत सुधारणा करुन सध्या असलेले पक्षाचे अध्यक्ष यांनाच पुढे पाच वर्षासाठी बढती देण्याचा निर्णय एकमताने मंजूर करण्यात आला. आता 44 वर्ष वय असलेले अखिलेश यादव पुढील पाच वर्षे पक्षाच्या अध्यक्षपदाची कमान सांभाळतील. 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका त्यांच्याच अध्यक्षतेखाली होतील.  प्रदेश अध्यक्षपदाच्या निवडीतही राज्य कार्यकारिणीतर्फे कालावधी वाढवून पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नरेश ऊत्तम यांची एकमताने पुढील पाच वर्षासाठी फेरनिवड करण्यात आली होती. 

मुलायम आणि शिवपाल यांना संधी नाही... 

पक्षाच्या 23 सप्टेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनापासून मुलाय़म आणि शिवपाल यांनी दुर राहणेच पसंत केले. या अधिवेशनासाठी अखिलेश यांनी स्वत: या दोघांना उपस्थित राहण्यासाठी आवाहन केले होते. यावेळी सर्वकाही ठीक असून शिवपाल यांनी आपल्याला शुभेच्छा आणि आशीर्वाद फोनवरुन कळवले असल्याचे, अखिलेश यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या पुर्वसंधेला घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.  गेल्या वर्षी अखिलेश आणि शिवपाल यांच्यात झालेला वाद हा सर्वश्रुत आहे.

मुलायम यांच्या आशीर्वादाने अखिलेश आनंदित 

मुलायम यांनी दिलेल्या शुभेच्छा आणि आशीर्वादामुळे आपण आनंदित झालो असल्याचे अखिलेश यांनी यावेळी सांगितले. 77 वर्ष वय असलेल्या मुलायम यांनी पाठवलेल्या शुभेच्छाच्या पत्रात "आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद हे नेहमी अखिलेशसोबत असतील कारण; तो आपला मुलगा आहे. परंतु त्याने घेतलेल्या निर्णयांचे आपण समर्थन करत नाही", असे म्हटले आहे. 'येणाऱ्या 2019 च्य़ा लोकसभाच नाहीतर; 2022 च्या विधानसभा निवडणुकांचेही निकाल हे आपल्याच बाजुने असतील. त्याची चिंता नसावी,' असेही यावेळी अखिलेश यादव यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: akhilesh yadav mulayam singh yadav uttar pradesh samajwadi party