योगी आदित्यनाथ तिला वाचवू शकले नाहीत : अखिलेश यादव

वृत्तसंस्था
Saturday, 7 December 2019

पीडितेला न्याय मिळवून देण्यात अपयशी ठरल्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, गृहसचिव आणि पोलिस महासंचालकांनी राजीनामा द्यावा. या घटनेच्या ऩिषेधार्थ उद्या सर्व जिल्ह्यांमध्ये शोकसभेचे आयोजन करण्यात येणार आहे, असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.

लखनौ : उन्नावमधील बलात्कार पीडितेला जाळून मारणे ही अत्यंत निंदनीय घटना आहे. हा काळा दिवस आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात घडलेली ही पहिली घटना नाही. अपराधियोंको ठोक दिया जाएगा असे म्हणणारे मुख्यमंत्री पीडितेला वाचवू शकले नाहीत, अशी जोरदार टीका उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अखिलेश यादव म्हणाले, की पीडितेला न्याय मिळवून देण्यात अपयशी ठरल्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, गृहसचिव आणि पोलिस महासंचालकांनी राजीनामा द्यावा. या घटनेच्या ऩिषेधार्थ उद्या सर्व जिल्ह्यांमध्ये शोकसभेचे आयोजन करण्यात येणार आहे, असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.

तिच्या किंकाळ्या अखेर थांबल्या; उन्नाव बलात्कार पीडितेचा मृत्यू

उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेवर गुरुवारी सकाळी न्यायालयाकडे जात असताना नराधमांनी हल्ला करत तिला पेटवून दिले होते. अखेर आज (शनिवार) सुमारे 40 तासांनी तिच्या किंकाळ्या शांत झाल्या असून, तिचा मृत्यूशी लढा अपयशी ठरला आहे. गुरुवारी तिला पेटवून दिल्यानंतर लखनौहून तिला एअर ऍम्ब्युलन्सने दिल्लीला उपचारासाठी हलविण्यात आले होते. मात्र, 90 टक्के ती भाजली असल्याने अखेर तिचा मृत्यू झाला आहे. उन्नाव येथील बलात्कार पीडितेचा शुक्रवारी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात मृत्यू झाला. बलात्कार पीडित महिलेला गुरुवारी पहाटे आरोपींनी जाळण्याचा प्रयत्न केला होता, त्यात ती 90 टक्क्य़ांहून अधिक भाजल्यानंतर तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री 11.40 च्या सुमारास सफदरजंग रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. कार्डिऍक अरेस्टमुळे तिचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली. यापूर्वी तिला कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले होते.

बलात्काऱ्यांचा जागेवर ‘फैसला’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akhilesh Yadav statement on Unnao rape case in Uttar Pradesh