शिधापत्रिकेवरील अखिलेश यांचे छायाचित्र दिशाभूल करणारे: भाजप

वृत्तसंस्था
रविवार, 2 एप्रिल 2017

उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाची सत्ता असताना तत्कालिन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे छायाचित्र शिधापत्रिकेवर छापण्यात आले होते. भाजपची सत्ता आल्यानंतर हे छायाचित्र हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान शिधापत्रिकेवर छायाचित्र छापणे हीन दर्जाचे राजकारण असून हा प्रकार दिशाभूल करणारा असल्याची टीका भाजपने केली आहे.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाची सत्ता असताना तत्कालिन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे छायाचित्र शिधापत्रिकेवर छापण्यात आले होते. भाजपची सत्ता आल्यानंतर हे छायाचित्र हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान शिधापत्रिकेवर छायाचित्र छापणे हीन दर्जाचे राजकारण असून हा प्रकार दिशाभूल करणारा असल्याची टीका भाजपने केली आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना भाजप नेते एस. प्रकाश म्हणाले, "करदात्या नागरिकांच्या पैशातून नागरिकांच्या सुविधेसाठी देण्यात येणाऱ्या शिधापत्रिकेवर अखिलेश यादव यांचे छायाचित्र छापण्याचा प्रकार दिशाभूल करणारार असून हे हीन दर्जाचे राजकारण आहे. आता उत्तर प्रदेशमध्ये सत्ताबदल झाल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोणाच्याही छायाचित्राशिवाय शिधापत्रिका छापण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. श्रेय घेणे हा वेगळा प्रकार आहे. मात्र शिधापत्रिकेवर छायाचित्र छापणे हा प्रकार अस्वीकारार्ह्य आहे.'

अखिलेश यादव यांचे छायाचित्र असलेले आणि अद्याप वितरित न केलेल्या लाखो शिधापत्रिका मागे घेण्याचा निर्णय आदित्यनाथ यांनी शनिवारी जाहीर केला आहे. निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यापूर्वीच अखिलेश यादव यांचे छायाचित्र असलेल्या आणि वितरित केलेल्या 3.4 कोटी शिधापत्रिका रद्द करण्याचा निर्णय तत्कालिन सरकारने घेतला होता.

नव्या शिधापत्रिका
नव्या शिधापत्रिका या आधार क्रमांकाला जोडलेल्या असणार आहेत. त्यामध्ये चीप आणि बारकोड असणार आहे. शिवाय शिधापत्रिकाधारकाची सविस्तर माहितीही असणार आहे. नव्या शिधापत्रिका वितरित करेपर्यंत शिधापत्रिका धारकांना शिधा खरेदी करण्यासाठी पेपर स्लिप पुरविण्यात येणार आहेत.

Web Title: Akhilesh Yadav's photo on ration cards was misleading : BJP