Crop Insurance Compensation Row
esakal
‘प्रधानमंत्री पीक विमा योजने’बाबत आलेल्या तक्रारींवरून केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांशी चर्चा केली. ‘एक रुपया, तीन रुपये, पाच रुपये किंवा २१ रुपये अशा पद्धतीने पीकविम्याची भरपाई मिळणे ही शेतकऱ्यांची थट्टा आहे, ’ अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. तसेच यासंदर्भात सखोल चौकशीचे आदेशही दिले. कृषिमंत्री चौहान यांनी पीकविमा योजनेबाबत आज व्हर्च्युअल पद्धतीने उच्चस्तरीय बैठक घेऊन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांशी चर्चा केली.