esakal | भारतीय FAU:G लवकरच; PUB-G वर बंदीनंतर अक्षय कुमारची घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

Fau-G

पबजीवर बंदी घातल्यानंतर बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने मोठी घोषणा केली आहे. तुम्ही जर पबजीला मिस करत असाल तर लवकरच तुमच्यासाठी पर्याय मिळणार आहे.

भारतीय FAU:G लवकरच; PUB-G वर बंदीनंतर अक्षय कुमारची घोषणा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली - भारत सरकारने चिनी ॲप्सवर बंदी घालून डिजिटल स्ट्राइक केला. पुन्हा एकदा भारताने 118 ॲप्सवर बंदी घातली. यामध्ये सर्वाधिक लोकप्रिय अशा पबजीचा समावेश आहे. पबजी बंद झाल्याने ही गेम खेळणाऱ्या अनेकांनी नाराजीही व्यक्त केली. तर पबजीवरून मीम्ससुद्धा व्हायरल झाले. आता पबजीवर बंदी घातल्यानंतर बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने मोठी घोषणा केली आहे. तुम्ही जर पबजीला मिस करत असाल तर लवकरच तुमच्यासाठी पर्याय मिळणार आहे. FAU:G लवकरच येणार असल्याचं अक्षय कुमारने म्हटलं आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

FAU:G नावाचं हे ॲप अक्षय कुमारच्या मेंटरशिपमध्ये तया केलं जाणार असून मल्टिप्लेअर ॲक्शन गेम असेल. पबजीला टक्कर देण्यासाठी येणारं हे ॲप पूर्ण भारतीय असेल. तसंच त्यातून मिळणाऱ्या कमाईतील 20 टक्के भाग हा 'भारत के वीर ट्रस्ट'ला दान केला जाणार आहे. भारताच्या वीर जवानांसाठी हे ट्रस्ट काम करतं. 

अक्षय कुमारने म्हटलं की,'तरुणांसाठी गेमिंग हे मनोरंजनाचा एक अविभाज्य असा भाग बनला आहे. FAU:G च्या माध्यमातून अशी आशा व्यक्त करतो की ही गेम खेळतील तेव्हा आपल्या देशाच्या जवानांच्या बलिदानाची त्यांना माहिती होईल. 

FAU:G पुढच्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात लाँच करण्याची तयारी केली जात आहे. ही गेम गूगल प्ले स्टोअर आणि ॲपल प्ले स्टोअरवर लाँच करण्यात येईल. 

कोरोनाच्या संकटात पोलिसांचे मानवतेसाठी मोठं काम; पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक

भारतात पबजीशिवाय लूडो ऑल स्टार, वर्ल्ड लूडो सुपरस्टार या गेम्ससुद्धा बॅन करण्यात आल्या आहेत. याआधी केंद्र सरकारने गलवान खोऱ्यात झालेल्या वादानंतर 106 ॲप्सवर बंदी घातली होती. त्यात टिकटॉक, वी चॅट, युसी ब्राउजर, युसी न्यूज यांसारख्या ॲप्सचा समावेश होता. चीनशी संबंधित एकूण 224 ॲपवर आतापर्यंत अशी कारवाई करण्यात आली आहे. सरकारने बंदी घालताना म्हटलं की, देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होत असल्यानं ही कारवाई करण्यात आली.

Edited By - Prashant Patil