एसआयटीकडून अक्षयकुमारची दोन तास कसून चौकशी

एसआयटीकडून अक्षयकुमारची दोन तास कसून चौकशी

मुंबई- शीख धर्मग्रंथाच्या कथित अपमानप्रकरणी अभिनेता अक्षय कुमार याची आज (ता.21) बुधवारी एसआयटीकडून दोन तास कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान अक्षयला विविध प्रश्न विचारण्यात आले. या चौकशीदरम्यान आपल्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचे अक्षयने सांगितले आहे.

कोटकपूरा पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या खटल्यासंबंधी माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, शिरोमणी अकाली दलाचे सर्वेसर्वा सुखबीरसिंग बादल आणि अक्षयकुमारला समन्स पाठवण्यात आले होते. याप्रकरणी अक्षयकुमारवर न्या. रणजीत सिंग आयोगाच्या अहवालात गंभीर आरोप लावण्यात आले होते. या आरोपांनुसार, अक्षयने 20 सप्टेंबर 2015 रोजी आपल्या फ्लॅटवर तत्कालीन उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल, स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आणि बालात्कार प्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत असलेला गुरमीत राम रहिम यांची भेट घडवून आणल्याचा आरोप आहे. या बैठकीतच राम रहिमचा चित्रपट पंजाबमध्ये प्रदर्शित करण्यावर शिक्कामोर्तब झाले होते, असे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार चौकशी पथकाने चंदीगडमध्ये अक्षयकुमारची सखोल चौकशी केली. यामध्ये राम राहिम आणि सुखबीर बादल यांच्यासोबत झालेल्या भेटी आणि गुरुग्रंथ साहिब या धर्मग्रंथाच्या कथीत अपमानप्रकरणी अनेक प्रश्न त्याला विचारण्यात आले. अक्षय कुमारने हे आरोप फेटाळताना विनाकारणच आपले नाव यामध्ये गोवण्यात आल्याचे सांगताना गुरुग्रंथ साहिबचा आपण कसलाही अपमान केलेला नाही असे स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com