अक्षय कुमारने लाईक केले भाजपविरोधातील ट्विट अन् मग....  

वृत्तसंस्था
सोमवार, 16 डिसेंबर 2019

अक्षय भाजपचे समर्थन करतो, अशा टीका त्याच्यावर केल्या गेल्या. आज त्याने एक ट्विट केले. त्यात त्याने त्याची चूक मान्य केली. काय आहे ही चूक? आणि असे काय घडले की अक्षयने असे ट्विट केले...

मुंबई : नेहमीच भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ भूमिका घेणाऱ्या अक्षय कुमारने आश्चर्यकारक गोष्ट केली. दिल्लीत जामीया मिलीया विद्यापीठात गदारोळ सुरू असतानाच सोशल मीडियावरही त्याचे पडसाद उमटलेले दिसतात. अशातच अभिनेता अक्षय कुमारने भाजपविरोधात असलेल्या आंदोलनाचे ट्विट लाईक केले अन् मग काय....

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अक्षय कुमार नेहमीच भाजप सरकारचे कौतुक करताना दिसतो. काही दिवसांपूर्वी त्याने पंतप्रधान मोदींची मुलाखत घेतली होती. यावरूनही अक्षय भाजपचे समर्थन करतो, अशा टीका त्याच्यावर केल्या गेल्या. आज त्याने एक ट्विट केले. त्यात त्याने त्याची चूक मान्य केली. काय आहे ही चूक? आणि असे काय घडले की अक्षयने असे ट्विट केले...

जामीया इस्लामिया विद्यापीठाबाहेर जाळपोळ, बस पेटवल्या; 'कॅब' विरोधाला हिंसक वळण

अक्षय कुमारने ट्विट केले आहे की, 'ट्विटरवर स्क्रोल करत असताना जामीया मिलीयातील सरकारविरोधी आंदोलनाची एक पोस्ट माझ्याकडून लाईक झाली. मला ती चूक लक्षात आली तेव्हा मी लगेचच ती पोस्ट अनलाईक केली. मी अशा देशविरोधी कृत्यांना कधीच समर्थन देणार नाही.' असे अक्षय म्हणतो. त्याने हे ट्विट केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या गेल्या आहेत. तसेच त्याने हे ट्विट का केले असावे यावरही तर्क सुरू आहेत. 

Video : हॉस्टेलबाहेर पडला नाहीत, तर तुमच्या जीवाचं बरंवाईट होईल; जामीया मिलीयातील विद्यार्थीनीचा आर्त स्वर

जामिया मिलिया विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांनी नागरिकत्व कायद्याविरोधात मोर्चा काढल्याने परिस्थिती चिघळली होती. आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत जाळपोळ केली. यानंतर जामीया मीलिया व उत्तर प्रदेशातील अलिगढ विद्यापीठात पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला. यात अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत, तर विद्यार्थ्यांनी केलेल्या दगडफेकीमुळे काही पोलिसही जखमी झाले आहेत.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akshay Kumar gives explanation on twitter about deleting tweet of jamia milia agitation