
Carbon Dioxide: पृथ्वीच्या वातावरणात २०२३ मध्ये कार्बन डाय ऑक्साइडची पातळी ४२० भाग प्रति दशलक्ष (पीपीएम) इतकी झाली आहे. गेल्या आठ लाख वर्षांतील ही सर्वाधिक वाढ आहे. १८५० ते १९०० या शतकातील मूळ पातळीच्या (बेसलाईन) तुलनेत ही दीर्घकालीन जागतिक तापमानवाढ १.३४ ते १.४१ अंश सेल्सिअसने वाढल्याचा अंदाज आहे, असे जागतिक हवामान संघटनेच्या (डब्ल्यूएमओ) बुधवारी प्रसिद्ध झालेल्या हवामान स्थिती अहवालात नमूद केले आहे.