
CBSC Pattern: राज्यात आगामी शैक्षणिक वर्षापासून सीबीएसई पॅटर्न लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. पुण्यातील पालक आणि विद्यार्थी मात्र या शैक्षणिक बदलासाठी तयार नसल्याचं चित्र पहायला मिळतं आहे. त्यानुसार, पालकांची आणि विद्यार्थ्यांचीही या बदलासाठी मानसिक तयारी झालेली दिसत नाही. हा पॅटर्न जर राज्यात लागू झाला तर त्यामुळं अनेक समस्या निर्माण होऊ शकतात, असा दावा या पालाकांनी केला आहे.