पाकिस्तानी नागरिकाची सागरी मार्गाने घुसखोरी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

पश्‍चिम कच्छमधील जखाउ बंदरावर किमान दोन नावा येण्याचा इशारा देण्यात आला असून त्यांमधील किमान एका नावेवर पाकिस्तानी नागरिक असण्याची शक्‍यता असल्याचे सुरक्षा संस्थांनी म्हटले आहे

भूज - पाकिस्तानी घुसखोर सागरी मार्गाने गुजरातमध्ये घुसण्याची शक्‍यता असल्याचा इशारा केंद्रीय सुरक्षा संस्थांनी दिल्याच्या पार्श्‍वभूमीवर कच्छ जिल्ह्यामध्ये "हाय अलर्ट' घोषित करण्यात आला आहे.

पश्‍चिम कच्छमधील जखाउ बंदरावर किमान दोन नावा येण्याचा इशारा देण्यात आला असून त्यांमधील किमान एका नावेवर पाकिस्तानी नागरिक असण्याची शक्‍यता असल्याचे सुरक्षा संस्थांनी म्हटले आहे. जखाउ येथे आल्यानंतर हा पाकिस्तानी नागरिक पूर्व कच्छ भागात जाण्याची शक्‍यता आहे.

या गंभीर इशाऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील पश्‍चिम भागामधून येणाऱ्या प्रत्येक गाडीची कसून तपासणी करण्यात येत आहे. याचबरोबर, या भागामधील सर्व हॉटेल व अतिथीगृहांचीही तपासणी करण्यात येत असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

Web Title: Alert in Kutch over inputs of Pak intrusion by sea