'आप'च्या सर्व 33 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

Aam Aadmi Party
Aam Aadmi Party

अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीत लढलेल्या आम आदमी पक्षाच्या (आप) सर्व 33 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. मात्र, 'आप'ने हा ईव्हीएमचा विजय असून गुजरात हारल्याचे म्हटले आहे.

गुजरातमध्ये सोमवारी जाहीर झालेल्या निकालानंतर 'आप'ने भाजपवर टीका केली. ईव्हीएममधून आलेल्या 25 टक्के स्लीपची चौकशी करण्यास निवडणूक आयोग तयार नसल्याचे 'आप'ने म्हटले आहे. हे सर्व आगोदरच फिक्स असल्याचा आरोपही 'आप'ने केला आहे.

'आप'चे प्रवक्ते सौरभ भारद्वाज म्हणाले, की प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला खूप कमी गर्दी होती. तर, पाटीदार नेता हार्दिक पटेलच्या सभा आणि रोड शोला प्रचंड गर्दी होत होती. मात्र, चित्र वेगळेच दिसत आहे. निवडणूक आयोगाने एका बुथवर देण्यात आलेल्या स्लिपवरून मतमोजणी करून दाखवावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com