सावध पवित्रा! व्यावसायिक उड्डाणांवर बंदी कायम, DGCA ने जारी केले आदेश | International Flight | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Flight

सावध पवित्रा! व्यावसायिक उड्डाणांवर बंदी कायम, DGCA ने जारी केले आदेश

नवी दिल्ली : कोरोनाची (Corona) रूग्णसंख्या जरी झपाट्याने कमी होत असली तरी, खबरदारीची उपाय म्हणून सरकारकडून व्यावसायिक प्रवासी सेवा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यावसायिक उड्डाणांवर पुढील आदेशापर्यंत निर्बंध लागू राहतील, असे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) सोमवारी (दि.28) जारी केलेल्या आदेश स्पष्ट केले आहे. (All Commercial Flights Ban Till Further Order)

गेल्या दोन वर्षांपासून जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाच्या रूग्णसंख्या जगासह भारतातदेखील (Corona Update India) घट होताना दिसत आहे. दरम्यान, कोरोनाच्या वाढता प्रकोप रोखण्यासाठी भारत सरकारकडून आंतरराष्ट्रीय (International Flights Ban In India) विमान सेवांवर निर्बंध लादण्यात आले होते. हे निर्बंध 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत जारी करण्यात आले होते. आज यामध्ये पुन्हा वाढ करण्यात आली आहे. मालवाहू आणि DGCA मान्यताप्राप्त उड्डाणांवर हा निर्णय लागू राहणार नाहीये, तसेच संबंधित आदेश बबल व्यवस्थेअंतर्गत येणाऱ्या विमानसेवांसाठीही लागू होणार नसल्याचे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने जारी केलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: Ukraine Russia War LIVE : विद्यार्थ्यांनो रेल्वे स्थानकांवर जा, भारतीय राजदूतांचा सल्ला

23 मार्च 2020 पासून उड्डाणे बंद

यापूर्वी, देशातील कोरोनाव्हायरसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे, सरकारने व्यावसायिक प्रवासी सेवेवरील बंदी 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवली होती. 23 मार्च 2020 पासून भारतात येणारी सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे कोरोनामुळे बंद करण्यात आली आहेत.

Web Title: All Commercial Flights Ban Till Further Orders Says Dgca

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top