

Advocating for Consumer Rights: Nationwide Protest at Jantar Mantar
Sakal
नारायणगाव : ग्राहकांच्या हितासाठी कमाल किरकोळ किंमत (एमआरपी) व्यवस्थेमध्ये मूलभूत सुधारणा व्हाव्यात. एमआरपी ठरवण्यासाठी स्वतंत्र आणि सक्षम कायदा करण्यात यावा. ग्राहकांना वस्तूंच्या किंमतीबाबत संपूर्ण पारदर्शक माहिती मिळावी.या प्रमुख मागण्यांसाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने २५ मे रोजी दिल्ली येथील जंतर-मंतर येथे सत्याग्रह आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे मध्य महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष बाळासाहेब औटी यांनी दिली.