केदारनाथाच्या चरणी PM मोदी; आदि शंकराचार्यांच्या मुर्तीचं केलं अनावरण

केदारनाथाच्या चरणी PM मोदी; आदि शंकराचार्यांच्या मुर्तीचं केलं अनावरण

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिवाळीनिमित्त उत्तराखंडमधील केदारनाथ धाम येथे पोहोचले आहेत. पंतप्रधान झाल्यापासून पाचव्यांदा मोदी या ठिकाणी पोहोचले असून या ठिकाणच्या सुप्रसिद्ध केदारनाथ मंदिरात त्यांनी बाबा भोलेनाथाची पूजा केली आहे. त्यानंतर त्यांनी आदि गुरु शंकराचार्यांच्या समाधीचं अनावरण देखील केलं आहे. 2013 साली आलेल्या मोठ्या प्रलयादरम्यान या समाधीचं नुकसान झालं होतं. पंतप्रधान केदारनाथमध्ये सुरु असलेल्या विकासकामांचा देखील आढावा घेणार आहेत. या ठिकाणी पंतप्रधान मोदींनी उपस्थित भक्तगणांसमोर आपलं मनोगत व्यक्त केलंय.

केदारनाथाच्या चरणी PM मोदी; आदि शंकराचार्यांच्या मुर्तीचं केलं अनावरण
दारू प्यायल्याने आणखी सहा जणांचा मृत्यू, मृतांची संख्या २४ वर

नरेंद्र मोदींनी आज संबोधनाच्या सुरुवातीलाच जय बाबा केदार अशा घोषणा दिल्या. ते म्हणाले की, अनेक तिर्थक्षेत्रांवर देशातील संतगण, महंत, वरिष्ठ ऋषीमुनी तसेच अनेक श्रद्धाळू आज केदारनाथच्या या पवित्र भूमीसोहत प्रत्यक्षात नसेल पण आत्मिक रुपाने आपल्याला आशीर्वाद देत आहेत.

पुढे ते म्हणाले की, आदी शंकराचार्यांच्या समाधीच्या पुनर्स्थापनेचे साक्षीदार बनले आहात. हे अलौकिक दृश्य आहे. देश एवढा मोठा आहे, एवढी महान ऋषी परंपरा आहे. आजही भारतात एकापेक्षा एक तपस्वी अध्यात्मिक चेतना जागृत करत असतात. मी फक्त त्यांची नावे जरी घेत बसलो तरी आठवडा लागेल. एखादं नाव घ्यायचं राहून गेलं तर मी आयुष्यभर पापाच्या ओझ्याखाली राहिन. त्या सर्वांना आदरपूर्वक प्रणाम करतो. त्यांचे आशीर्वाद आपल्याला शक्ती देतील.

केदारनाथाच्या चरणी PM मोदी; आदि शंकराचार्यांच्या मुर्तीचं केलं अनावरण
''प्राणीप्रेम असेल तर मासांहार कमी करा, पण फटाके फोडू द्या''

रामचरितमानसमध्ये म्हटलंय की, काही अनुभव इतके वेगळे असतात की ते शब्दांत व्यक्त करता येत नाहीत. असाच अनुभव केदारनाथमध्ये येतो. दिवाळीच्या या पवित्र पर्वामध्ये काल मी सीमेवर आपल्या सैन्यासोबत होतो, आणि आज मी तुमच्यासोबत आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

250 कोटींच्या विकासकामांचं उद्घाटन

पंतप्रधान मोदी केदारनाथच्या मंदिरामध्ये पूजा केल्यानंतर ते २५० कोटींच्या केदारपुरी पुनर्विकास योजनांचं उद्घाटन करणार आहेत. केदारनाथच्या या दौऱ्याच्या निमित्ताने मोदी एका महिन्यामध्ये दुसऱ्यांदा उत्तराखंडला गेले आहेत. मोदी आज ज्या योजनांची घोषणा करणार आहे त्यामध्ये आदि गुरु शंकराचार्यांच्या समाधीसंदर्भातील योजनांचाही समावेश आहे. मोदींच्या हस्ते आदि गुरु शंकराचार्यांच्या प्रतिमेचंही अनावरण केलं जाणार आहे. मोदी यांच्या हस्ते केदारपुरी पुनर्विकासच्या दुसऱ्या टप्प्यामधील प्रकल्पांचे भूमिपूजन केलं जाणार आहे. या योजना १५० कोटी रुपयांच्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com