सर्व पैसा काळा नव्हे : राहुल गांधी

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

नवी दिल्ली : नोटाबंदीचा निर्णय हा भ्रष्टाचार व काळा पैशाविरोधी लढा नव्हे, तर तो सामान्य जनता व शेतकऱ्यांच्या विरोधातील लढा आहे. सर्व पैसा हा काळा नसून सर्व काळा पैसा हा रोख स्वरूपात नाही. नोटाबंदी म्हणजे काळ्या पैशाविरोधातील सर्जिकल स्ट्राइक नसून मोदींनी गरीब जनतेवर टाकलेला बॉंब असल्याची टीका कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केली.

नवी दिल्ली : नोटाबंदीचा निर्णय हा भ्रष्टाचार व काळा पैशाविरोधी लढा नव्हे, तर तो सामान्य जनता व शेतकऱ्यांच्या विरोधातील लढा आहे. सर्व पैसा हा काळा नसून सर्व काळा पैसा हा रोख स्वरूपात नाही. नोटाबंदी म्हणजे काळ्या पैशाविरोधातील सर्जिकल स्ट्राइक नसून मोदींनी गरीब जनतेवर टाकलेला बॉंब असल्याची टीका कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केली.

नोटाबंदीविरोधात जौनपूर येथे आयोजित रॅलीला संबोधित करताना ते बोलत होते. राहुल गांधी म्हणाले, ""नोटाबंदीचा निर्णय हा भ्रष्टाचाराविरोधी लढा असल्याच्या वल्गना सुरू आहेत. हा निर्णय घेऊन मोदींनी फक्त गरीब जनतेचा पैसाच काढून घेतला नाही, तर त्यांचे रक्तही शोषले आहे. यामुळे ते रोज अश्रू ढाळत आहेत. शेतकऱ्यांची कर्जे माफ करा, अशी विनंती आम्ही मोदींना केली होती. पण त्यांनी याबद्दल ब्र काढला नाही. हे आहे देशाचे वास्तव. संसदेत मोदी म्हणतात, देशात मजूर राहिला नाही. ही एकप्रकारे मनरेगा योजनेची थट्टा आहे. मोदींनी तरुणांना 2 कोटी रोजगारनिर्मितीचे स्वप्न दाखविले आणि त्यांचे आयुष्य उद्‌ध्वस्त केले.''

मोदींबद्दल आमचे मत कडवे असले, तरी आम्ही कधी खालच्या थराला जात मुर्दाबादसारख्या घोषणा दिल्या नाहीत. ते काम संघाचे (आरएसएस) आहे. असे सांगून मोदींनी देशाला खूप काही दिले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. असा चिमटा गांधी यांनी काढला. गेल्या काही महिन्यांत मोदींनी देशातील 60 टक्के संपत्ती ही मूठभर लोकांकडे लोकांच्या सोपविली. खरा काळा पैसा त्या 50 कुटुंबांकडे आहे की देशातील जनतेकडे, असा प्रश्न गांधी यांनी उपस्थित केला.

ज्यांच्याकडे काळा पैसा आहे. तो एक तर विदेशी बॅंकांत ठेवला आहे किंवा मालमत्ता, सोने खरेदी करून त्यात गुंतवला आहे. अशी मंडळी मोदींच्या प्रचाराचा खर्च उचलते. त्यामुळे मोदी त्यांना पाठीशी घालत आहेत. या उद्योगपतींकडे बॅंकांचे 8 लाख कोटी रुपयांची कर्जे आहेत. त्यापैकी 1 लाख 10 हजार कोटींची कर्जे मोदींनी माफ केल्याचा आरोप गांधी यांनी केला. माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तरी ठीक आहे. मात्र, येणाऱ्या काळात सत्य बाहेर येईलच, असेही गांधी यांनी नमूद केले.
............. ............. .........

Web Title: all money is not black, rahul gandhi