Gyanvapi ASI Survey: ज्ञानवापी मशीद प्रकरणात ASI सर्व्हेक्षण होणार की नाही? ३ ऑगस्टला होणार फैसला

अलाहाबाद हायकोर्टानं सध्या या सर्व्हेक्षणावरील स्थगिती कायम ठेवली असून ३ ऑगस्टला फैसला सुनावण्यात येणार आहे.
Gyanvapi Masjid Survey
Gyanvapi Masjid Surveyesakal

Gyanvapi ASI Survey: ज्ञानवापी मशीदीच्या ASI सर्व्हेच्या प्रकरणात महत्वाची अपडेट आली आहे. यामध्ये हे सर्व्हेक्षण करायचं की नाही याचा फैसला ३ ऑगस्ट रोजी होणार आहे. आलाहाबाद हायकोर्टानं ३ तारखेपर्यंत आपला निकाल राखून ठेवण्यात आला आहे. तोपर्यंत या सर्व्हेला स्थगिती कायम राहणार आहे.

याप्रकरणी अंजुमन इंतेजामिया मस्जीद कमिटीनं वाराणसी जिल्हा कोर्टाच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात आव्हान दिलं होतं. जिल्हा कोर्टानं २१ जुलै रोजी ज्ञानवापी मशीद परिसराच्या ASI सर्व्हेचे आदेश दिले होते. (Allahabad HC Reserves Order For August 3 Stay On ASI Survey Extended)

ज्ञानवापी मशीद परिसर हा वाराणसीत काशी विश्वनाथ मंदिराच्या पुढेच स्थित आहे. त्यामुळं या मशीदीच्या जागी पूर्वीच्या काळी मंदीर अस्तित्वात होतं, त्यामुळं आम्हाला सध्याच्या मशिदीत पूजेची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी ४ हिंदू महिलांनी केली होती. त्यानंतर हे प्रकरण वाराणसी जिल्हा कोर्टात गेलं. त्यानंतर कोर्टानं ज्ञानवापी मशीद परिसराचं भारतीय सर्वेक्षण विभागाद्वारे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. (Latest Marathi News)

Gyanvapi Masjid Survey
Supreme Court: EDच्या संचालकांना तात्पुरती मुदतवाढ; सुप्रीम कोर्टाचा केंद्राला दिलासा

पण वाराणसी जिल्हा कोर्टाच्या या आदेशांविरोधात अंजुमन मशीद कमिटीनं आलाहाबाद हायकोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर कोर्टानं या सर्वेक्षणाला आजपर्यंत स्थगिती दिली होती. त्यानंतर आज यावर पुन्हा सुनावणी झाली त्यानंतर हायकोर्टानं या सर्वेक्षणाला ३ ऑगस्टपर्यंत स्थगिती दिली तसेच यावरील निर्णय राखून ठेवला.

Gyanvapi Masjid Survey
Supreme Court: EDच्या संचालकांना तात्पुरती मुदतवाढ; सुप्रीम कोर्टाचा केंद्राला दिलासा

सर्व्हेक्षण झालं तर मशीद उद्ध्वस्त होईल - मशीद कमिटी

दरम्यान, सुप्रीम कोर्टानं २४ जुलै रोजी ज्ञानवापी मशीद परिसराच्या सर्व्हेक्षणाला २६ जुलैच्या संध्याकाळी ५ वाजेपर्यंत स्थगिती दिली होती. हा वेळ सुप्रीम कोर्टानं यासाठी दिला होता की, मशीद कमिटीला हायकोर्टात याबाबत दाद मागता यावी. त्यानंतर कमिटीनं हायकोर्टात धाव घेतल्यानंतर आलाहाबाद हायकोर्टानं काल गुरुवारपर्यंत २७ जुलै स्थगिती दिली होती.

अंजुमन मशीद कमिटीनं कोर्टात आपली बाजू मांडताना कोर्टाला सांगितलं होतं की, "जर या परिसराचं वैज्ञानिक सर्व्हेक्षण झालं तर मशीदाचा संपूर्ण परिसर उद्ध्वस्त करण्यात येईल, असं याचिकाकर्त्या हिंदू महिलांचं म्हणणं आहे"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com