Gyanvapi Case: ज्ञानवापी प्रकरणी हिंदू गटाला झटका! 'ही' याचिका हायकोर्टानं फेटाळली

आलाहाबाद हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.
Gyanvapi Case
Gyanvapi Caseesakal

लखनऊ : ज्ञानवापी परिसरात बिगरहिंदूंना प्रवेश बंदी करण्यात यावी, यासाठी आलाहाबाद हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती, ही याचिका आज हायकोर्टानं फेटाळली. राखी सिंह आणि इतरांनी ही याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती प्रितींकर दिवाकर आणि न्या. आशुतोष श्रीवास्तव यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

Gyanvapi Case
माजी CJI रंजन गोगोईंनी पहिल्यांदाच केलं राज्यसभेत भाषण; 4 महिला खासदारांनी केलं वॉकआऊट

याचिकेत काय म्हटलंय?

या जनहित याचिकेत मागणी करण्यात आली होती की, "श्रृंगार गौरी केसमध्ये जोपर्यंत वाराणसी जिल्हा न्यायालयाचा निर्णय येत नाही. तोपर्यंत परिसरात बिगरहिंदूंना प्रवेशबंदी करण्यात यावी आणि ज्ञानवापी परिसरात मिळालेल्या हिंदू प्रतिकांना संरक्षित करण्याचे आदेश देण्यात यावेत" (Latest Marathi News)

Gyanvapi Case
No-Confidence Motion: आम्हाला सत्ता नाही तर शांतता हवी! अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेत काँग्रेसचे मोदींना 'हे' ३ सवाल

यात पुढे म्हटलं की, वाराणसीत श्री आदि विश्वेश्वर मंदिराच्या (सध्याचं ज्ञानवापी परिसर) प्राचीन अवशेषांना वाचवायचं आहे. तसेच यात असाही दावा करण्यात आला आहे की, वादग्रस्त जागेवर एक भव्य मंदिर होतं जिथं भगवान शिवानं स्वतः ज्योतिर्लिंगची स्थापना केली होती. (Marathi Tajya Batmya)

Gyanvapi Case
Delhi Service Bill 2023: केजरीवालांना मोठा झटका! 'दिल्ली सेवा विधेयक' राज्यसभेतही मंजूर

औरंगजेबानं नष्ट केलं होतं मंदिर

असं सांगितलं जात की, सन १६६९ मध्ये मुस्लिम शासक औरंगजेबनं हे मंदिर उद्ध्वस्त केलं होतं. या मंदिरला उद्ध्वस्त केल्यानंतर मुस्लिमांनी अनधिकृतरित्या मंदिर परिसरात अतिक्रमण केलं आणि एक नवं बांधकाम केलं जी आज ज्ञानवापी मशीद आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com