'मला भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवायचीय!'; हत्येतील दोषीची मागणी ऐकून हायकोर्टाने शिक्षेला दिली स्थगिती, नेमकं प्रकरण काय?

Allahabad High Court Stays Murder Convict’s Sentence : अपीलावर अंतिम निर्णय होईपर्यंत शिक्षा स्थगित ठेवण्याची मागणी त्याने केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला. न्यायमूर्ती सिद्धार्थ आणि न्यायमूर्ती विनय कुमार द्विवेदी यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.
Allahabad High Court,

Allahabad High Court,

esakal

Updated on: 

उत्तर प्रदेशात २०२७ मध्ये होणारी विधानसभा निवडणूक लढवायची असल्याचे कारण देत हत्या प्रकरणातील दोषीच्या दोषसिद्धीला स्थगिती देण्यात आली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. नंदलाल राय असं या दोषीचं नाव आहे. त्याच्या जन्मठेपेच्या शिक्षेला आणि दोषसिद्धीला न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरोधात रायने उच्च न्यायालयात अपील दाखल केलं होतं. या अपीलावर अंतिम निर्णय होईपर्यंत शिक्षा स्थगित ठेवण्याची मागणी त्याने केली होती. त्यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला. न्यायमूर्ती सिद्धार्थ आणि न्यायमूर्ती विनय कुमार द्विवेदी यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com