

Allahabad High Court ruling highlights that a husband’s legal obligation to provide maintenance to his wife continues even after his death, allowing claims from family assets.
esakal
Allahabad High Court on Wife Maintenance Rights : अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निकालात काही गंभीर निरीक्षणे नोंदवली आहेत.पतीने आपल्या पत्नीविरुद्ध 'शपथभंग'केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू करण्याची परवानगी मागितली होती. उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, पत्नीला पोटगी देण्याचे पतीचे कायदेशीर कर्तव्य त्याच्या मृत्यूनंतरही संपुष्टात येत नाही. न्यायालयाने नमूद केले की, पत्नीला तिच्या मृत पतीच्या मालमत्तेतून पोटगी मागण्याचा अधिकार आहे,आणि जर ती मालमत्ता अपुरी ठरली तर ती तिच्या सासऱ्याच्या मालमत्तेतून पोटगीची मागणी करू शकते.पतीने आपल्या पत्नीला पोटगी देण्याचे कर्तव्य पार पाडले पाहिजे, हे एक सुस्थापित कायदेशीर तत्त्व असल्याचे न्यायालयाने अधोरेखित केले.