'आलोक वर्मा-राकेश अस्थाना मांजरांसारखे भांडत होते'

पीटीआय
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : सीबीआयमधील दोन वरिष्ठ अधिकारी आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना यांच्यातील वाद सार्वजनिक झाला होता. दोघेही मांजरांप्रमाणे भांडत होते. सरकार याप्रकरणी चिंतेत होते, बरोबर कोण आणि चुकीचे कोण, याचा निर्णय सरकारला घ्यायचा होता, असे प्रतिपादन ऍटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी आज केंद्र सरकारच्या वतीने न्यायालयात केले. आता यापुढील सुनावणी उद्या (ता. 6) होणार आहे. 

सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना सुटीवर पाठवल्याविरोधात दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. त्या वेळी सरकारने भूमिका स्पष्ट केली. 
आलोक वर्मा हे आपला वाद जनतेत घेऊन जाणार आहेत, याचा काही पुरावा आहे का, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने वेणुगोपाल यांना विचारला. त्या वेळी वेणुगोपाल यांनी न्यायालयाला वृत्तपत्रांची कात्रणे दिली. सीबीआयवर जनतेचा विश्वास कायम राहावा यासाठी सरकारला तातडीची कारवाई करणे आवश्‍यक होते. परिस्थितीच अशी आली होती की, केंद्र सरकारला यात दखल द्यावी लागली. या प्रकरणाचा अत्यंत सावधानतेने तपास केल्यानंतर सीबीआय संचालकांना सुटीवर पाठवण्यात आल्याचे ते म्हणाले. 

वेणुगोपाल म्हणाले की, आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना यांच्यातील वाद जनतेमध्ये चर्चेचा विषय बनला होता. केंद्र सरकार याप्रकरणी लक्ष ठेवून होते. दोघेही मांजरीप्रमाणे भांडत होते.

Web Title: Alok Verma Rakesh Asthana was fighting like a cat