भाजपला पर्याय जनादेशातून उभा राहील : सीताराम येचुरी

माकपच्या केंद्रीय समितीची २२ ते २४ ऑक्टोबर अशी तीन दिवसीय बैठक झाली
Sitaram Yechury
Sitaram Yechurysakal media

नवी दिल्ली : भाजप विरोधात कॉंग्रेस पक्ष समर्थ पर्याय असू शकत नाही, असा डाव्या नेत्यांचा हल्लाबोल आणि बिहारमध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलामध्ये सुरू असलेली चिखलफेक या पार्श्वभूमीवर विरोधी ऐक्यावर सवाल उपस्थित होत आहेया पार्श्वभूमीवर,’ सत्ताधारी भाजपला समर्थ पर्याय एखाद्या पक्षाच्या निर्णयातून नव्हे तर जनादेशातून उभा राहील’, असा दावा माकप सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी आज केला.

माकपच्या केंद्रीय समितीची २२ ते २४ ऑक्टोबर अशी तीन दिवसीय बैठक झाली. या बैठकीमध्ये केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी कॉंग्रेस पक्ष हा भाजपला समर्थ पर्याय असू शकत नाही, असे म्हटल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस केंद्रीत विरोधी ऐक्याबाबत वेगवेगळे तर्क लढविले जात आहे. केरळमध्ये काँग्रेस आणि माकप एकमेकांविरोधात निवडणूक लढले होते. तर पश्चिम बंगालमध्ये कांग्रेस आणि माकपची आघाडी होती.

त्यापार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना पक्ष येचुरी यांनी सांगितले, की केंद्रीय समितीमध्ये कॉंग्रेसबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. मात्र भाजपला समर्थ राजकीय पर्याय देण्याच्या मुद्द्यावर अंतिम निर्णय जनतेचा असेल आणि तोही निवडणुकीनंतर ठरेल. या आधी कॉंग्रेसविरोधात जनता पक्षाचे सरकार निवडणुकीनंतर झाले होते. तर वाजपेयी सरकारच्या विरोधात यूपीएचा पर्याय निवडणुकीनंतर पुढ्यात आला होता, अशी याकडे येचुरी यांनी लक्ष वेधले.

निदर्शनांना पाठिंबा

येत्या २६ नोव्हेंबरला संयुक्त किसान मोर्चा आणि कामगार संघटनांनी जाहीर केलेल्या देशव्यापी निदर्शनांना माकपचा पाठींबा असल्याचा पाठींबा येचुरी यांनी जाहीर केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com