मला जगू द्या - अमरसिंह

वृत्तसंस्था
रविवार, 1 जानेवारी 2017

माझे नाव या प्रकरणात विनाकारण ओढले जात आहे. काही लोक माझ्या नावाने आक्षेपार्ह पोस्टर लावत आहेत, माझे पुतळे जाळले जात आहेत. काहीजण तर मला खूप शक्तिशाली असल्याचे भासवत मी जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसून राजकीय उलथापालथ करू शकतो, असे म्हणतात. पण मला जगू द्या.

लखनौ - यादव कुटुंबातील कलहाला मला जबाबदार ठरवू नका. मला जगू द्या. मला जबाबदार धरण्यात येत असेल तर मुलायमसिंहांनी माझा बळी घ्यावा अन् माझी पक्षातून सुट्टी करावी, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे नेते अमरसिंह यांनी केले आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावरील निलंबन मागे घेतल्यानंतर समाजवादी पक्षातील संभाव्य दुही टळली होती. परंतु या सर्व कटकारस्थानास मुलायमसिंह यांचे निकटवर्तीय अमरसिंह जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे. परंतु सध्या लंडनमध्ये असलेल्या अमरसिंह यांनी हा आरोप फेटाळत सतत मलाच का दोषी धरण्यात येते असे म्हटले आहे.

अमरसिंह म्हणाले, की माझे नाव या प्रकरणात विनाकारण ओढले जात आहे. काही लोक माझ्या नावाने आक्षेपार्ह पोस्टर लावत आहेत, माझे पुतळे जाळले जात आहेत. काहीजण तर मला खूप शक्तिशाली असल्याचे भासवत मी जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसून राजकीय उलथापालथ करू शकतो, असे म्हणतात. पण मला जगू द्या. विनाकारण मला खलनायक बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यापासून मला वाचवा. मला तुमच्यापासून काही नको आहे.

Web Title: amar singh reacts on allegations that he is behind feud in the samajwadi party