
या यात्रेकरुंच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफ जवान आणि प्रशासन अर्लट झाले आहे.
अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात, कडक पोलिस बंदोबस्त तैनात
कोरोनाकाळात मागील दोन वर्षांपासून अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली होती. मात्र आजपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली आहे. यंदाच्या वर्षी होत असलेल्या बाबा बर्फानी (Baba Barfani) यांच्या यात्रेला यात्रेकरूंचा उदंड प्रतिसाद पाहायला मिळत आहे. यंदाची अमरनाथ यात्रा 43 दिवस चालणार आहे. आजपासून सुरु झालेल्या यात्रेची सांगता 11 ऑगस्ट रोजी होणार आहे. (amarnath yatra 2022)
दरम्यान, या यात्रेकरुंच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफ जवान आणि प्रशासन अर्लट झाले आहे. पहलगाम बेस कँमवर सुमारे 10 हजार यात्रेकरु पोहोचले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये अलिकडे तणावाचं वातावरण आहे, यामुळे जम्मू-काश्मीर प्रशासन तसेच पोलिस प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती पावले उचलताना दिसत आहे.
हेही वाचा: विरोधकांकडे आता बोलायला काय राहिलं? शिवसेनेचा सवाल
यात्रेसाठी पोलिसांकडून सुरक्षेचा आराखडा तयार करण्यात आला असून अतिरिक्त जवानही तैनात करण्यात आले आहेत. पहलगाम आणि बालटाल येथील बेस कँपमधून दररोज सुमारे 10-10 हजार भाविक बाबा बर्फानी यांच्या दर्शनाला पोहोचणार आहेत. यात्रेला मोठा जनसागर लोटण्याची शक्यता असल्याने दहशतवादाचं सावट आहे. या पार्श्वभूमीवर सैन्य दलही सतर्क आहे. कोरोनानंतर दोन वर्षांनी यात्रा असल्याने भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, यंदा अमरनाथ यात्रेसाठी जास्तीत जास्त भाविक येण्याची अपेक्षा आहे. यापूर्वी 2018 मध्ये यात्रेसाठी 2.85 लाख भाविक आले होते. 2011 मध्ये सर्वाधिक 6.35 लाख यात्रेकरू आले होते. तर यंदाच्या वर्षी यात्रेसाठी आठ लाखांहून अधिक भाविक यात्रेसाठी येऊ शकतात, असा जम्मू-काश्मीर प्रशासनाचा अंदाज आहे.
हेही वाचा: ईडीच्या वादळात तुमचा आख्खा वाडा उध्दवस्त झाला; शेट्टींचा महाविकास आघाडीवर 'प्रहार'
Web Title: Amarnath Yatr 202 Start From Today For First Batch Tight Security From Crpf Pilgrims
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..