खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित; प्रशासनाचा निर्णय

काश्मीर खोऱ्यात पुढील 24 ते 36 तास पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Amarnath Yatra
Amarnath YatraSakal

नवी दिल्ली : खराब हवामानामुळे जम्मू-काश्मीरमधील पवित्र अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खराब हवामानामुळे ही बंदी घालण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. श्रीनगरमधील अनेक भागात रात्रीपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. यामुळे पहलगाम आणि बालटाल भागात दरड कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात आली असून, सुरक्षेचा उपाय म्हणून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच वातावरण निरभ्र होईपर्यंत भाविकांना बेस कॅम्पमध्ये थांबण्यास सांगण्यात आले आहे.

काश्मीर खोऱ्यात पुढील 24 ते 36 तास पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रात्री उशिरापासून खोऱ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. 30 जून रोजी यात्रा सुरू झाल्यापासून आतापर्यंत 40,233 यात्रेकरूंनी येथे भेट दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आतापर्यंत ७२,००० हून अधिक भाविकांनी पवित्र गुहेतील बर्फापासून बनवलेल्या शिवलिंगाचे दर्शन घेतले आहे. अमरनाथ यात्रा 11 ऑगस्टला रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर संपणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com