अमरनाथ यात्रेवर हल्‍ल्याचे सावट

वृत्तसंस्था
Sunday, 19 July 2020

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या लष्कराच्या मोहिमेत आत्तापर्यंत शेकडो दहशतवादी ठार झाले. यामुळेच काश्‍मीरमधील महामार्ग क्र.४४ वरील अमरनाथ यात्रेवर हल्ल्याचा कट रचण्याची शक्यता वर्तविली जात आहे. लष्कराच्या ‘ऑपरेशन ऑल आउट’ आणि अन्य मोहिमांमुळे दहशतवाद्यांवर जरब बसली आहे. लष्कर आणि सुरक्षा दल सावध असल्याने दहशतवाद्यांचा डाव उधळून लावला जाईल असा विश्‍वास व्यक्त होत आहे.

नवी दिल्ली - जम्मू-काश्‍मीरमध्ये मंगळवारपासून (ता. २१) प्रारंभ होणाऱ्या अमरनाथ यात्रेला यंदा  दहशतवादाचे सावट आहे. 

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या लष्कराच्या मोहिमेत आत्तापर्यंत शेकडो दहशतवादी ठार झाले. यामुळेच काश्‍मीरमधील महामार्ग क्र. ४४ वरील अमरनाथ यात्रेवर हल्ल्याचा कट रचण्याची शक्यता वर्तविली जात आहे. लष्कराच्या ‘ऑपरेशन ऑल आउट’ आणि अन्य मोहिमांमुळे दहशतवाद्यांवर जरब बसली आहे. लष्कर आणि सुरक्षा दल सावध असल्याने दहशतवाद्यांचा डाव उधळून लावला जाईल असा विश्‍वास व्यक्त होत आहे.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दक्षिण काश्‍मीरमधील पत्रकार परिषदेत टू सेक्टरचे कमांडर ब्रिगेडियर विवेकसिंह ठाकूर म्हणाले, ‘‘ अमरनाथ यात्रेवर हल्ला करण्याचा प्रयत्न दहशतवादी करतील, अशी माहिती मिळाली आहे. मात्र अमरनाथ यात्रा शांततेत व निर्धोक वातावरणात पूर्ण होईल, अशी व्यवस्था व उपाययोजना प्रशासनाने केल्या आहेत. कोणतेही विघ्न न येता अमरनाथ यात्रा पार पाडण्यासाठी आम्ही बांधिल आहोत. अमरनाथला जाण्यासाठी भाविक राष्ट्रीय महामार्ग ४४ चा उपयोग करणार आहेत. हा मार्ग थोडा संवेदनशील आहे.’’

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amarnath yatra terror attack chances