
यात्रेच्या माध्यमातून आरएसएस काश्मीरमधील परिस्थिती चिघळवणार असल्याचं दहशतवाद्यांनी म्हटलंय
अमरनाथ यात्रेवर दहशतवाद्यांचं सावट, ..अन्यथा गंभीर परिणाम होतील
पुढील महिन्यातील म्हणजेच 30 जूनपासून अमरनाथ (Amarnaath) यात्रेला (Pilgrimage ) सुरूवात होत आहे. दरम्यान, आता या यात्रेसंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. अमरनाथ यात्रेवर दहशतवादाचे (Terrorism) सावट दिसत असल्याची बातमी मिळाली आहे. TRR या दहशतवादी संघटनेने पत्राद्वारे धमकी दिली असून या पत्रातून केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर टीका केली आहे. यात्रेच्या माध्यमातून आरएसएस काश्मीरमधील परिस्थिती चिघळवणार असल्याचं दहशतवाद्यांनी म्हटलं आहे.
TRF ने पत्राद्वारे धमकी देत म्हटलं आहे की, आम्ही अमरनाथ यात्रेच्याविरोधात किंवा काश्मीरमध्ये येणाऱ्या भाविकांच्याही विरोधात नाही. परंतु केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांच्या घाणेरड्या राजकारणासाठी अमरनाथ यात्रेचा वापर करणार असल्याचे आमच्या लक्षात आले आहे. यात्रेसाठी 15, 000 ते 8 लाख यात्रेकरूंची नोंदणी ही 15 दिवसांपासून ते 80 दिवसांपर्यंत करण्यात येत आहे. याद्वारे RSS आपल्या स्वयंसेवकांना काश्मीरमधील परिस्थिती चिघळवण्यासाठी पाठवत असल्याचा दावा या संघटनेनं केला आहे.
हेही वाचा: 'राज ठाकरेंवर बोलण्यापेक्षा राऊतांनी एकटं मुंबई-महाराष्ट्र फिरून दाखवावं'
आम्ही कोणत्याही धार्मिक यात्रेच्या विरोधात नाही. मात्र, धार्मिक यात्रांचा वापर काश्मीरमधील संघर्षाविरोधात होत असल्याचे चित्र दिसत आहे. तर आम्ही त्याच्या विरोधात आहोत, असेही टीआरएफने स्पष्ट केलं आहे. राजकीय फायद्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू असून त्याला विरोध करणार असल्याचे टीआरएफने म्हटलं आहे. अमरनाथ यात्रेसाठी येणारे भाविक सुरक्षित राहतील. मात्र, त्यांनी संघाच्या स्वयंसेवकांना मदत, आश्रय देऊ नये. अन्यथा गंभीर परिणाम होतील अशीही धमकी दहशतवाद्यांनी दिली आहे.
दरम्यान, यंदा अमरनाथ यात्रा 30 जूनपासून पहलगाम आणि बालटाल या दोन मार्गांपासून सुरू होणार आहे. दुसरीकडे, श्रीनगर पोलिसांनी प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कर/टीआरएफच्या 2 स्थानिक संकरित दहशतवाद्यांना अटक केली आहे. जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी अमरनाथ यात्रेशी संबंधित सर्व कामे पूर्ण करण्यासाठी 15 जूनपर्यंत मुदत दिली आहे. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी सर्व सुविधा आणि योग्य तयारी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
हेही वाचा: 'आपली कातडी वाचवण्यासाठी BJP बृजभूषण सिंहांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतंय'
Web Title: Amarnath Yatra Terror Group Of Trf Issues Threat Ahead Amarnath Jammu Kashmir
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..