Sachin Sawant I 'आपली कातडी वाचवण्यासाठी BJP बृजभूषण सिंहांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतंय' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

politics

'बृजभूषण सिंह यांचे राष्ट्रवादीच्या नेत्यांशी कनेक्शन असल्यामुळे दरेकर विरोध करत नाहीत ना?'

'आपली कातडी वाचवण्यासाठी BJP बृजभूषण सिंहांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतंय'

सध्या अनेक राजकीय मुद्द्यांवरून महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा तुर्तास स्थगित करण्यात आला आहे. दौरा का स्थिगत झाला याची कारणेही त्यांनी काल पुणे येथे झालेल्या सभेत दिली आहेत. जाहीर सभेत बोलत असताना राज ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य करत अप्रत्यक्षरित्या महाविकास आघाडीवर निशाणाही साधला. दरम्यान, अयोध्या दौऱ्याला विरोध हा ट्रॅप असून महाराष्ट्रातून यासाठी रसद पुरवली जात आहे, असा आरोपही राज ठाकरे यांनी केला. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधून यावर प्रतिक्रियाही आल्या.

आता पुन्हा एकदा कॉंग्रेसचे सचिन सावंत यांनी भाजपावर टोला लगावला असून त्यांनी एक ट्विट केलं आहे. यांसदर्भात प्रविण दरेकर यांनी एका खासगी वृत्तवाहीनीशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. त्यावरून सचिन सावंत म्हणतात, महाराष्ट्रातील भाजप आपली कातडी वाचवण्यासाठी भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. ‌प्रविण दरेकर यांनी बृजभूषण सिंह यांचे राष्ट्रवादीच्या नेत्यांशी कनेक्शन असल्यामुळे विरोध करत नाहीत ना? अशी शंका व्यक्त केली. जर असे असेल तर बृजभूषण यांना पक्षातून निलंबित करावे, अशी मागणीही दरेकरांनी केली आहे. जनतेला सर्व काही कळत आणि त्यांचा रोख हा राष्ट्रवादी आणि सत्तेतील सहयोगी शिवसेनेच्या पक्षांवर होता, असंही दरेकर म्हणाले आहेत.

हेही वाचा: 'व्हत्याच नव्हतं अन् नव्हत्याच व्हतं, पवारांच्या नादला लागू नका'

दरम्यान, पुण्यातील सभेत बोलत असताना राज ठाकरे यांनी विरोधकांवर टोलेबाजी केली. माझ्या अयोध्या दौऱ्याच्या घोषणेनंतर ज्या काही राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्या तो एक ट्रॅप होता. त्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरविण्यात आली. अयोध्यावारी खुपणाऱ्यांनी हे काम केलं आहे, असा अरोप त्यांनी केला होता. ऐन निवडणुकीवेळी महाराष्टातील मनसेच्या कार्यकर्त्यांमागे कोर्ट कचेरीच्या गोष्टी मागे लावल्या असत्या. उत्तर प्रदेशातील एका खासदाराला आव्हान देणं शक्य आहे का?, असंही ते म्हणाले होते.

राज ठाकरे यांच्या कालच्या सभेनंतर सचिन सावंत यांनी एक ट्विट करत अयोध्या दौऱ्याला विरोध हा ट्रॅप भाजपचा असल्याते गणित उलगडले होते. ते म्हणाले की, अयोध्येत गेलो असतो तर केसेस टाकल्या असत्या, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. मात्र कोणी केसेस टाकल्या असत्या तर योगी सरकारने. कारण तिथे युपीमध्ये महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार असणार नाही. त्यामुळे त्यांच्या आयोध्या दौऱ्याला विरोध करणारा हा ट्रॅप महाराष्ट्रातील सरकारचा नसून भाजपाचाच आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपानेच हा ट्रॅप टाकला असे अप्रत्यक्षरित्या राज ठाकरे यांचेही मत असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा: '...हे तर होणारच होतं, भूमिका बदलली नाही ते शरद पवार कसले?'

Web Title: Sachin Sawant Criticize To Bjp Brij Bhushan Singh Connection With Ncp Leaders Demand Of Resign Post

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top