esakal | अ‍ॅमेझॉन भारतातील लघु उद्योग करणार डिजिटल
sakal

बोलून बातमी शोधा

Amazon

अ‍ॅमेझॉन भारतातील लघु उद्योग करणार डिजिटल

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेली अॅमेझॉनने आता भारतातील लघु-मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी गुंतवणूक करणार आहे. यासाठी कंपनीचे मालक जेफ बेजोस यांनी २५० मिलियन डॉलर निधी (१८७३ कोटी रुपये) उभारण्याची घोषणा केली आहे. हा निधी भारतातील लघु-मध्यम उद्योगांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्यास मदत करणार आहे. त्याचबरोबर कृषी आणि आरोग्य क्षेत्रात संशोधनाला प्रोत्साहन दिलं जाणार आहे.

हेही वाचा: फास्ट अँड फ्युरियसचा ट्रेलर आला; गंज राडा...

अॅमेझॉनच्या वेब सर्विसेसचे सीईओ एंडी जेसी म्हणाले, "लघु-मध्यम उद्योग हे अर्थव्यवस्थेला पुढे घेऊन जात असतात. भारतासंदर्भातही ही बाब खरी आहे. आम्ही भारतात लघु-मध्यम उद्योगांना (एमएसबी) पुढे वाढवण्यासाठी उत्साही आहोत. यामुळे आम्ही घोषित केलेला निधी संशोधन आणि अर्थव्यवस्थेला योगदान देऊ शकेल. त्यामुळे अॅमेझॉन वेंचर निधीची घोषणा केल्यानं आम्ही खूप खूश आहे.

नव्या उद्योगांना मिळणार प्रोत्साहन

जेसी यांनी गुरुवारी अॅमेझॉनच्या कार्यक्रमाला संबोधित करताना म्हटलं, या निधी अतंर्गत एमएसबीला नव्या उद्योगांच्या निर्मितीसाठी प्रोत्साहित करणे हा अॅमेझॉनचा हेतू आहे. जेसी या वर्षानंतर अॅमेझॉन इंकच्या सीईओपदाचा कार्यभार सांभाळणार आहेत. अॅमेझॉन इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि भारतातील कन्ट्री प्रमुख अमित अग्रवाल म्हणाले, या निधीचं उत्कृष्ठ कल्पनांना सशक्त बनवण्याचं लक्ष्य आहे. यामध्ये दूरदृष्टी असलेल्या उद्योजकांना आकर्षित केलं जाईल.