अमेझॉनने तिरंगी डोअरमॅट साईटवरून हटविला

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 जानेवारी 2017

कॅनडातील तिरंगी डोअरमॅटची विक्री तातडीने थांबवा, अन्यथा तुमच्या कर्मचाऱ्यांचा व्हिसा रोखू; तसेच याआधी जारी करण्यात आलेल्या व्हिसांवर देखील पुनर्विचार केला जाईल, असा सज्जड दम स्वराज यांनी अमेझॉन कंपनीला भरला होता.

वॉशिंग्टन - राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी अमेझॉन कंपनीला खडे बोल सुनाविल्यानंतर अमेझॉनने तिरंगी डोअरमॅट साईटवरून हटविला आहे.

कॅनडातील तिरंगी डोअरमॅटची विक्री तातडीने थांबवा, अन्यथा तुमच्या कर्मचाऱ्यांचा व्हिसा रोखू; तसेच याआधी जारी करण्यात आलेल्या व्हिसांवर देखील पुनर्विचार केला जाईल, असा सज्जड दम स्वराज यांनी अमेझॉन कंपनीला भरला होता. भारताच्या राष्ट्रध्वजाचा अवमान करणाऱ्या सर्व साधनांची विक्री तातडीने थांबवावी, असे स्वराज यांनी ट्विटरवरून व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेत म्हटले होते.

त्यानंतर तातडीने अमेझॉनने आपल्या कॅनडातील ई कॉमर्सच्या वेबसाईटवरून तिरंगी डोअरमॅट हटविला. हा डोअरमॅट आता विक्रीसाठी उपलब्ध नसल्याचे अमेझॉनच्या प्रवक्त्याने सांगितले. 

Web Title: Amazon removes Indian flag doormat from website